Target Killing in Kashmir: काश्मीरमध्ये बँकेत घुसून मॅनेजरची हत्या, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:52 PM2022-06-02T15:52:16+5:302022-06-02T15:52:42+5:30
Target Killing in Kashmir: गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत.
Target Killing in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात आज(गुरुवार) एका दहशतवाद्याने बँकेत घुसून मॅनेजरची हत्या केल्याची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत राजस्थानचे रहिवासी असलेले बँक मॅनेजर विजय कुमार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे.
#WATCH | J&K: Terrorist fires at bank manager at Ellaqie Dehati Bank at Areh Mohanpora in Kulgam district.
— ANI (@ANI) June 2, 2022
The bank manager later succumbed to his injuries.
(CCTV visuals) pic.twitter.com/uIxVS29KVI
ही घटना इलाकाई देहाती बँकेच्या अरेह मोहनपोरा शाखेत झाली आहे. विजय कुमार या शाखेत मॅनेजर होते. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दहशतवाद्याने केलेला हल्ला स्पष्टपणे दिसत आहे. यात दिसतंय की, एक व्यक्ती बँकेच्या बाहेर उभा आहे, आधी तो इकडे तिकडे पाहतो आणि थोड्या वेळाने बँकेत घुसतो. यानंतर अचानक तो मॅनेजरवर गोळ्या झाडून पळ काढतो. या हल्ल्यात जखमी झालेल्या मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू होतो.
घाटीत टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या
काश्मीर घाटीत गेल्या एका महिन्यात तिसऱ्यांदा बिगर मुस्लिम व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. तसेच, गेल्या महिन्याभरात ही आठवी हत्या आहे. यापूर्वी 31 मे रोजी एका हिंदू शिक्षिकेची शाळेत घुसून हत्या करण्यात आली होती. त्यापूर्वी, 25 मे रोजी राहुल भट्ट नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याची त्याच्या ऑफीसमध्ये हत्या झाली. या टार्गेट किलिंगमध्ये काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक हिंदू कर्मचाऱ्यांनी जम्मूमध्ये बदली करण्याची मागणी केली आहे.