Target Killing in Kashmir: विजय, रजनी, राहुल...दहशतवाद्यांच्या निशाण्यावर हिंदू; एका महीन्यात अनेक हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 02:36 PM2022-06-02T14:36:53+5:302022-06-02T14:37:14+5:30
Target Killing in Kashmir: गेल्या एका महिन्यात काश्मीर घाटीत 8वी टार्गेट किलिंग झाली आहे. परवाच दहशतवाद्यांनी एका शिक्षिकेची शाळेत घुसून हत्या केली होती.
Target Killing in Kashmir:जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आणखी एका हिंदूची हत्या केली. राजस्थानच्या हनुमानगडचे रहिवासी आणि सध्या काश्मीरमध्ये बँक मॅनेजर असलेल्या विजय कुमार यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. आज(गुरुवारी) कुलगाममधील बँकेत घुसून विजयवर गोळीबार केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे त्यांचा मृत्यू झाला.
एका महिन्यात 8वी टार्गेट किलिंग
काश्मीरमध्ये गेल्या एका महिन्यातील ही 8वी टार्गेट किलिंग आहे. परवाच दहशतवाद्यांनी एका शिक्षिकेला शाळेत घुसून मारले होते. त्या आधी एका स्थानिक टीव्ही अभिनेत्रीचाही खून करण्यात आला. 31 मे रोजी शिक्षिका रजनी बाला यांची हत्या करण्यात आली होती. त्यापूर्वी 25 मे रोजी अमरीन भट्ट, 24 मे रोजी मुदस्सीर अहमद, 12 मे रोजी राहुल भट्ट आणि रियाझ अहमद ठाकोर यांची हत्या करण्यात आली. काश्मीरमधील दहशतवादी घटनांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेणार आहेत.
J&K | Terrorists fired upon a bank manager at Ellaqie Dehati Bank at Areh Mohanpora in Kulgam district. He received grievous gunshot injuries in this terror incident. He is a resident of Hanumangarh, Rajasthan. Area cordoned off: Police
— ANI (@ANI) June 2, 2022
रजनी बाला यांची मंगळवारी हत्या झाली
आज म्हणजेच गुरुवारच्या घटनेपूर्वी जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रजनी बाला यांची कुलगाममधील सरकारी शाळेत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याआधी, 12 मे रोजी बडगाम जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयात घुसून लिपिक राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. काश्मीरमध्ये दोन नागरिक आणि तीन ऑफ ड्युटी पोलीस दहशतवाद्यांनी मारले.
सरकारच्या निर्णयाचा विरोध
काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 पासून हे मृत्यू होत आहेत. याच दिवशी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले आहे. काश्मिरी पंडितांच्या परतीसाठी सरकारने प्रयत्न केले, त्यांना नोकऱ्या दिल्या आणि राहण्यासाठी घरेही दिली. सरकारच्या या पावलांमुळे दहशतवादी संतप्त होत असून हिंदूंसह इतर राज्यांतील लोकांना ते लक्ष्य करत आहेत.