१० हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचे पतंजलीचे लक्ष्य

By admin | Published: April 29, 2016 05:31 AM2016-04-29T05:31:13+5:302016-04-29T05:31:13+5:30

योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली या ब्रॅण्डअंतर्गत येणाऱ्या उत्पादनांचा प्रसार जोमाने झाला

The target of Patanjali's turnover of Rs. 10 thousand crores | १० हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचे पतंजलीचे लक्ष्य

१० हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचे पतंजलीचे लक्ष्य

Next

मुंबई : योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली या ब्रॅण्डअंतर्गत येणाऱ्या उत्पादनांचा प्रसार जोमाने झाला असून, ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने १५० टक्क्यांची वाढ नोंदवत पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांचा हा प्रसार असाच जोमाने सुरू राहणार असून, चालू आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या दुप्पट अर्थात दहा हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य कंपनीने निर्धारित केले आहे.
कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, कंपनीने २०११-१२ या वर्षी ४४६ कोटी रुपये, २०१२-१३ मध्ये ८५० कोटी रुपये, २०१३-१४ मध्ये १२०० कोटी रुपये, तर २०१४-१५ मध्ये २००६ कोटी रुपयांची उलाढाल केल्यानंतर २०१५-१५ मध्ये उलाढालीत दुप्पट वाढ नोंदवली आहे.
कंपनीने आता होम केअर, नॅचरल कॉस्मॅटिक अँड हेल्थ केअर, नॅचरल फूड, बीवरेज अँड हेल्थ ड्रिंक, असे चार विभाग निर्माण केले असून, याअंतर्गत २१ उत्पादनांच्या विक्रीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: The target of Patanjali's turnover of Rs. 10 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.