पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, नऊ जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 07:59 PM2019-06-17T19:59:28+5:302019-06-17T19:59:49+5:30
जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांना लक्ष्य करून होत असलेल्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, आज पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट घडवण्यात आला.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांना लक्ष्य करून होत असलेल्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, आज पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट घडवण्यात आला. लष्कराच्या ४४ राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनाला लक्ष्य करून घडवण्यात आलेल्या या स्फोटात ९ जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन जवानांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जवानांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jammu & Kashmir: An IED blast took place while a security forces' vehicle was moving in Arihal, Pulwama. Police at the spot ascertaining the facts. More details awaited. pic.twitter.com/GgKkSaym9u
— ANI (@ANI) June 17, 2019
पुलवामामधीली अरिहर गावातील अरिहल-लस्सीपुरा रस्त्यावर लष्कराचे चिलखती वाहन जात असताना हा आयईडी स्फोट घडवण्यात आला. हा स्फोट इतका भयंकर होता की त्यात लष्कराच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, या भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे.
Indian Army: Terrorists attempted to attack a mobile vehicle patrol of 44 RR with a vehicle based IED while the Army patrol was moving in general area Arihal in Pulwama this evening. The troops are safe, few minor injuries. Reports of attack on Army convoy are unfounded&baseless. https://t.co/seA8QqbX5A
— ANI (@ANI) June 17, 2019
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात येईल असा अलर्ट एका दिवसापूर्वीच आला होता. त्यानंतर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. दरम्यान, हा स्फोट झाल्यानंतर लष्कराने जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. दहशतवादी आपल्या इराद्यांमध्ये असफल ठरले असून, सर्व जवान सुरक्षित आहेत. काही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.