तस्कीन अहमदच्या हातात धोनीचं मुंडक असलेलं आक्षेपार्ह पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल
By admin | Published: March 5, 2016 06:06 PM2016-03-05T18:06:47+5:302016-03-05T18:12:20+5:30
आशिया कप टी२० सामन्यात भारत आणि बांग्लादेशमध्ये रविवारी होणा-या फायनल मॅचअगोदरच चाहत्यांमध्ये सोशल मिडियावर युद्ध रंगलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मिरपूर, दि. ५ - आशिया कप टी२० सामन्यात भारत आणि बांग्लादेशमध्ये रविवारी होणा-या फायनल मॅचअगोदरच चाहत्यांमध्ये सोशल मिडियावर युद्ध रंगलं आहे. बांग्लादेशचा क्रिकेटपटू तस्कीन अहमदच्या हातात धोनीचं मुंडक असलेला पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. भारतातील चाहत्यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला असून सध्या सोशल मिडियावर यावरुन युद्ध रंगलं आहे.
आशिया कप टी20 ची फायनल मॅच रविवारी शेर-ए-बांगला स्टेडीअमवर होणार आहे. या सिरिजमध्ये भारताचा पगडा भारी असल्याने भारतचं हा कप जिंकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र त्याअगोदर हा पोस्टर व्हायरल झाल्याने दोन्ही संघाच्या चाहत्यांची टशन आत्ताच सुरु झाली आहे. बांग्लादेशमधील क्रिकेट चाहत्याने हा पोस्टर व्हायरल केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याअगोदरही 2015मध्ये बांग्लादेशमधील वृत्तपत्राने भारतीय संघाचं अर्धमुंडण केलेला फोटो झापला होता. त्यावेळीदेखील बांग्लादेशवर जोरदार टीका झाली होती.