"मशीद आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार होतात"; तस्लिमा नसरीन यांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 11:14 AM2020-12-10T11:14:47+5:302020-12-10T11:20:51+5:30
Taslima Nasrin : तस्लिमा नसरीन यांनी यावेळी बांगलादेशमधील मशीद आणि मदरशांचा उल्लेख करत इमाम आणि शिक्षकांवर जोरदार निशाणा साधला आहे
नवी दिल्ली - आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasrin) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. तस्लिमा नसरीन यांनी यावेळी बांगलादेशमधील मशीद आणि मदरशांचा उल्लेख करत इमाम आणि शिक्षकांवर जोरदार निशाणा साधला आहे. याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. बांगलादेशमधीलमशिदींमध्ये इमाम आणि मदरशांमध्ये शिक्षक मुलांवर बलात्कार करतात असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
तस्लिमा नसरीन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "बांगलादेशमध्ये जवळपास दररोज इमाम आणि मदरसा शिक्षक मशीद आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार करतात. अल्लाहच्या नावाने ते बलात्कार करतात. अल्लाह दयाळू आहे हे त्यांना माहिती आहे. यामुळे दिवसातून पाच वेळ नमाज पठण केलं तर अल्लाह केलेलं पाप माफ करेल" असं तस्लिमा नसरीन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Imams and Madrasa teachers have been raping children in mosques and madrasas in Bangladesh everyday. They rape in the name of Allah. They know Allah is merciful, so Allah will forgive their sins only if they pray 5 times a day. https://t.co/Yeq13ldxrb
— taslima nasreen (@taslimanasreen) December 7, 2020
तस्लिमा नसरीन यांनी यावेळी फेसबुक पोस्टची लिंकही ट्विटमध्ये शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. याचे कारण होते, रहमानने सोशल मीडियावर शेअर केलेला कुटुंबाचा फोटो. या फोटोत रहमानच्या दोन्ही मुली रहिमा व खतीजा तसेच पत्नी सायरा अशा तिघी होत्या. या फोटोत रहमानची मुलगी खतीजाने बुरखा घातला होता. रहमानच्या मुलीने बुरखा घातलेला पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केले होते. यावेळी तस्लिमा नसरीन यांनी खतीजाच्या बुरख्यावर निशाणा साधला होता.
ए. आर. रहमानच्या मुलीला पाहिले की माझा जीव गुदमरतो...; तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट
"मला ए. आर. रहमानचे संगीत आवडते. पण जेव्हा केव्हा मी त्याच्या मुलीला बुरख्यात बघते, तेव्हा माझा श्वास गुदमरतो. सुसंस्कृत कुटुंबातील एका शिकलेल्या महिलेचेही किती सहजपणे ब्रेनवॉश केले जाऊ शकते, हे बघणे खरोखरच निराशाजनक आहे" असं ट्वीट तस्लिमा नसरीन यांनी केलं होतं. लोकांनी खतीजाला बुरख्यावरून ट्रोल केल्यानंतर तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं होतं.
खरंच की काय? हजार, बाराशे नाही तर शेतकऱ्याला आलं तब्बल 26 लाखांचं भलं मोठं विजेचं बिलhttps://t.co/D9D1u4xEdE#electricity#Bills#farmer
— Lokmat (@MiLOKMAT) December 10, 2020