टाटा आणि मिस्त्रींनी घेतली मोदींची भेट
By admin | Published: October 30, 2016 02:28 PM2016-10-30T14:28:44+5:302016-10-30T14:28:44+5:30
टाटाचे अंतरिम चेअरमन रतन टाटा आणि अध्यक्षपदावरून दूर करण्यात आलेले सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - टाटा उद्योग समूहात उद्भवलेल्या विवादाच्या पार्श्वभूमीवर टाटाचे अंतरिम चेअरमन रतन टाटा आणि अध्यक्षपदावरून दूर करण्यात आलेले सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या भेटीदरम्यान दोघांनीही टाटा समूहातील घटनाक्रमाबाबत पंतप्रधानांना माहिती देऊन आपापली बाजू मांडली.
सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून दूर केल्यानंतर गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेतली. तसेच पंतप्रधानांना टाटा समुहातील सद्यस्थितीबाबात माहिती दिली. तत्पूर्वी टाटा यांनी आपल्याला काम करण्यासाठी मोकळीक न दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शुक्रवारी रतन टाटा यांनीही नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, मिस्त्री यांना पदावरून दूर करण्यात आल्यानंतर रतन टाटा यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांना तातडीने फोन करून निर्णयाबाबत माहिती दिली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून त्यांना याबाबत माहिती दिली होती.