TATA समुह भारतीय हवाई दलासाठी वाहतूक विमान बनवणार; लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 03:27 PM2022-10-27T15:27:59+5:302022-10-27T15:55:16+5:30

भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा (TATA) एअरबसवर सोपवण्यात आली आहे.

TATA Group to build transport aircraft for Indian Air Force Information given by army officials | TATA समुह भारतीय हवाई दलासाठी वाहतूक विमान बनवणार; लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

TATA समुह भारतीय हवाई दलासाठी वाहतूक विमान बनवणार; लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

Next

भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा (TATA) एअरबसवर सोपवण्यात आली आहे. कंपनी या विमानांची निर्मिती वडोदरा येथील प्लांटमध्ये करणार आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

भारत आत्मनिर्भरच्या दिशेने फाऊले टाकत आहे. केंद्र सरकार देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. याद्वारेच आता भारतीय वायुदलाचे C-295 हे विमान आता गुजरातमधील वडोदरा येथील टाट एअरबेसमध्ये बनवण्यात येणार आहे.  

वडोदरातील ही सुविधा ४० विमाने बनवण्याव्यतिरिक्त हवाई दलाच्या आवश्यकतेसाठी अतिरिक्त विमाने तयार करेल. तसेच एअरबस स्पेनमधील त्यांच्या सुविधेमध्ये जे काम करते त्यापैकी ९६% काम भारतीय सुविधेत केले जाईल. विमानासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट सार्वजनिक क्षेत्रातील बीईएलद्वारे केले जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

India-UK FTA: ऋषी सुनक पंतप्रधान बनताच भारतासाठी पहिलीच गुड न्यूज; ब्रिटननं केली घोषणा


यामध्ये जास्तीत जास्त स्वदेशी साहित्य वापरले असेल. भारतात तयार केलेल्या विमानांचा पुरवठा २०२६ ते २०३१ या कालावधीत केला जाईल. पहिली १६ विमाने २०२३ ते २०२५ या वर्षीच्या दरम्यान मिळणार आहेत, असंही अधिकारी म्हणाले. 

Web Title: TATA Group to build transport aircraft for Indian Air Force Information given by army officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.