टाटा स्टील यूकेमधील स्टील उद्योग विकणार ?

By admin | Published: March 30, 2016 09:03 AM2016-03-30T09:03:25+5:302016-03-30T09:03:25+5:30

ब्रिटनमधील सर्वात मोठी स्टील उत्पादक भारतीय कंपनी टाटा स्टील यूकेमधील आपला संपूर्ण स्टील उद्योग विकण्याचा विचार करत आहे.

Tata Steel to sell steel industry in UK? | टाटा स्टील यूकेमधील स्टील उद्योग विकणार ?

टाटा स्टील यूकेमधील स्टील उद्योग विकणार ?

Next
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ३० - ब्रिटनमधील सर्वात मोठी स्टील उत्पादक भारतीय कंपनी टाटा स्टील यूकेमधील आपला संपूर्ण स्टील उद्योग विकण्याचा विचार करत आहे. यासंबंधी निर्णय घेण्यासाठी मुंबईत अनेक तास टाटा स्टीलच्या संचालक मंडळाची बैठक चालली. 
 
मागच्या काहीवर्षातील स्टील उद्योगाची कमकुवत स्थिती आणि मागच्या काही महिन्यात यूकेमध्ये टाटा स्टीलला मोठया तोटयाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे टाटा स्टील यूकेमधील स्टील उद्योग विकण्याचा विचार करत आहे. वाढता निर्माण खर्च, देशांतर्गत घटलेली मागणी आणि युरोपमध्ये चीनच्या स्टीलची वाढलेली आयात यामुळे कंपनीचा तोटा वाढत चालल्याने टाटा स्टील उद्योगविक्रीच्या निर्णयाप्रत आले आहे. 
 
स्टील उद्योगाचा युरोपमध्ये विस्तार करण्यासाठी टाटा स्टीलने २००७ मध्ये ब्रिटनमधील कोरस स्टील कंपनीचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर या कंपनीचे टाटा स्टील असे नामकरण झाले. पण स्टील उद्योगाची स्थिती खराब झाल्याने त्याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर झाला. 
 
टाटा स्टीलने खर्च कपातीचे विविध उपाय योजण्याचाही फायदा झाला नाही. टाटा स्टीलची यूके सरकार आणि विक्री संदर्भात ग्रेबुल कॅपिटलबरोबर चर्चा सुरु आहे. 
 

 

Web Title: Tata Steel to sell steel industry in UK?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.