Lockdown: टाटा ट्रस्टचा सर्वे: लॉकडाऊनमध्ये पोलिसांना 'या' गोष्टीचा सर्वाधिक त्रास; पण फायदाही झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 02:08 PM2021-08-20T14:08:57+5:302021-08-20T14:09:58+5:30

Police behavior in lockdown: टाटा ट्रस्ट, सीएसडीएसने कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळच्या लॉकडाऊनवेळी दहा राज्यांच्या पोलिसांची सामान्य लोकांशी वागणूक यावर एक रिपोर्ट तयार केला आहे. यामध्ये 40 प्रश्न पोलिसांना आणि 40 प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. 

Tata Trust survey: Police suffer most in lockdown; But there were also benefits | Lockdown: टाटा ट्रस्टचा सर्वे: लॉकडाऊनमध्ये पोलिसांना 'या' गोष्टीचा सर्वाधिक त्रास; पण फायदाही झाला

Lockdown: टाटा ट्रस्टचा सर्वे: लॉकडाऊनमध्ये पोलिसांना 'या' गोष्टीचा सर्वाधिक त्रास; पण फायदाही झाला

Next

कोरोना काळात (Corona Pandemic) सर्वाधिक त्रास जर कोणत्या यंत्रणेला झाला असेल तर तो आरोग्य आणि पोलिसांना. पहिल्या लॉकडाऊन (First Lockdown) काळात या परिस्थितीचा कोणीच अनुभव घेतला नव्हता. यामुळे लोकांच्या प्रश्नांना तोंड देणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांची तपासणी करणे आदी कामे जोखिम पत्करून करावी लागत होता. याच काळात घरगुती हिंसा आणि सायर क्राईमचे गुन्हे देखील मोठ्या प्रमाणावर वाढले होते. लोकनीति, टाटा ट्रस्ट, सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसाइटीज़ने सर्वे केला आहे. त्यातून ही बाब समोर आली आहे. (Lockdown Survey: Police used force during lockdown but were helpful too)

टाटा ट्रस्ट, सीएसडीएसने कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळच्या लॉकडाऊनवेळी दहा राज्यांच्या पोलिसांची सामान्य लोकांशी वागणूक यावर एक रिपोर्ट तयार केला आहे. यामध्ये 40 प्रश्न पोलिसांना आणि 40 प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. 

82 टक्के पोलिसांनी सांगितले की प्रवासी मजुरांनी लॉकडाऊन लागला तेव्हा खूप त्रास दिला. त्यांना सांभाळण्यासाठी, नियंत्रणासाठी 49 टक्के पोलिसांनी सांगितले की बळाचा वापर करावा लागला. 64 टक्के नागरिकांना सांगितले की, सरकारने लॉकडाऊन लावण्याआधी काही वेळ द्यायला हवा होता. 
45 टक्के पोलिसांनी सांगितले की, रस्त्यावर सामान्य नागरिकांसोबत ट्रॅव्हल पासवरून सर्वाधिक बाचाबाची झाली. श्रीमंतांनी आम्हाला चांगली वागणूक दिली तसेच कायदा पाळण्यासाठी मदत केली. 24 टक्के पोलिसांनी सांगितले की, गरीब लोकांनी आम्हाला सर्वाधिक पाठिंबा, मदत केली. 

पोलिसांना काय फायदा झाला....
सर्वेमध्ये लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये लॉकडाऊन काळात पोलिसांनी आपले काम इमानदारीने केल्याचे 86 टक्के नागरिकांनी सांगितले. 65 टक्के लोकांनी पोलिसाच्या नेहमीच्या वागणुकीपेक्षा त्यावेळची वागणूक चांगली होती, त्यांची प्रतिमा सुधारली आहे, असे सांगितले. तर 32 टक्के लोकांनी पोलिसांच्या प्रतिमेत काहीच सुधार झाला नसल्याचे सांगितले. 36 टक्के लोकांनी पोलिसांनी नियम पाळण्यासाठी अधिकारांची भीती दाखविल्याचे सांगितले. 55 टक्के लोक दंड, मारहाण, कोरोना टेस्टला घाबरल्याचे यामध्ये दिसले.

57 टक्के लोक घरातच

55 टक्के लोक दंड, मारहाण, कोरोना टेस्टला घाबरल्याचे यामध्ये दिसले. 57 टक्के लोकांना पोलिसांची भीती वाटत होती, म्हणून ते घराबाहेर पडले नाहीत. 43 टक्के लोकांना पोलिस त्यांना पकडून घेऊन जातील आणि कोरोना चाचणी करतील अशी भीती होती. तेवढ्याच लोकांना पोलीस अटक करतील अशी भीती होती.

Web Title: Tata Trust survey: Police suffer most in lockdown; But there were also benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.