टाट्रा खरेदी गैरव्यवहार तेजिंदर सिंग तुरुंगात
By admin | Published: September 2, 2014 02:06 AM2014-09-02T02:06:50+5:302014-09-02T02:06:50+5:30
कथितरीत्या 14 कोटींची लाच देऊ केल्याप्रकरणी येथील एका विशेष न्यायालयाने लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) तेजिंदरसिंग यांना आज सोमवारी अटक केली़
Next
नवी दिल्ली : हजारावर टाट्रा ट्रक्सच्या खरेदी व्यवहाराबाबतच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही़क़ेसिंग यांना कथितरीत्या 14 कोटींची लाच देऊ केल्याप्रकरणी येथील एका विशेष न्यायालयाने लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) तेजिंदरसिंग यांना आज सोमवारी अटक केली़
तत्पूर्वी विशेष सीबीआय न्यायाधीश मधू जैन यांनी त्यांची जामीन याचिका फेटाळून लावली आणि त्यांची 2क् ऑक्टोबर्पयत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ संबंधित प्रकरणाच्या तपासादरम्यान अटक केली गेली नाही, केवळ
म्हणून तेजिंदर यांना क्षमा करता येणार नाही़ कायदा सर्वासाठी समान आह़े
तेजिंदर यांची तुरुंगात रवानगी करा, असे न्यायालयाने म्हटल़े या प्रकरणाची पुढील सुनावणी 2क् ऑक्टोबरला होईल़
यादरम्यान सीबीआयने तेजिंदरसिंग यांना आरोपपत्र तसेच अन्य कागदपत्रंच्या प्रतिलिपी सोपवल्या़ ऑगस्ट ते सप्टेंबर 2क्1क् मध्ये 1676 टाट्रा वाहन खरेदीसंदर्भातील फाईली तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही़क़ेसिंग यांच्यासमक्ष प्रलंबित होत्या़ या वाहनांची तातडीची गरज आहे, असे तत्कालीन चीफ ऑफ आर्मी स्टाफला वाटत नव्हत़े त्यामुळे सिंग यांनी या मुद्यावर विविध पक्षांचा सल्ला मागितला होता़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
तेजिंदरसिंग यांनी 22 सप्टेंबर 2क्1क् रोजी साऊथ ब्लॉकमध्ये सिंग यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती़ या भेटीदरम्यान त्यांनी सिंग यांना टाट्रा वाहनांच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी कथितरीत्या 14 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रस्ताव दिला, असे सीबीआयने आपल्या आरोपपत्रत म्हटले आह़े