IPS होण्याचे स्वप्न पाहिलं पण टॅटूने केला घात; ‘ती’ गोष्ट समजताच तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 02:42 PM2023-04-06T14:42:53+5:302023-04-06T14:48:43+5:30
UPSC ची तयारी करत असताना एक दिवस IPS चा टॅटू काढला होता.
टॅटू एखाद्याच्या मृत्यूचं कारण बनू शकतो असं जर कोणी सांगितलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. आयपीएस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूमागे टॅटूच कारण बनले. कारण UPSC ची तयारी करत असताना त्याने एक दिवस IPS चा टॅटू काढला होता. तेव्हा एका मित्राने सांगितले की, आता तू कितीही मेहनत केलीस किंवा परीक्षा उत्तीर्ण झालास तरी फायनल सिलेक्शनमध्ये तुझी निवड केली जाणार नाही. कारण तो टॅटू काढला आहेस.
लखनौ येथील अभिषेक गौतम या तरुणाने टॅटूमुळे आत्महत्या केल्याने त्याचे आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. त्याच्या आत्महत्येनंतर दोन वर्षांनी अभिषेकच्या कुटुंबीयांनी दिल्लीत त्याच्या हत्येचा गुन्हा दाखल केला. आयपीएस होण्याचे अभिषेकचे स्वप्न होते. त्याने मनाशी ठरवले होते की 2021 मध्ये तो UPSC परीक्षा उत्तीर्ण होईल आणि IPS होईल. अभ्यासावर भर दिला. आपल्या खोलीत अनेक प्रसिद्ध आयपीएस अधिकाऱ्यांचे फोटोही लावले. रात्रंदिवस स्वप्नाचा पाठलाग करत अभिषेकने एक दिवस हातावर IPS टॅटू बनवला.
दुसर्याच दिवशी त्याने त्याचा मित्र ललित मिश्रा याला टॅटू दाखवला.मित्राने टॅटू पाहिल्यावर हे तू काय केलंस, आता परीक्षा पास झाल्यावरही तू सिलेक्ट होऊ शकणार नाही असं म्हटलं. अभिषेकचे वडील ब्रजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ललितशी बोलल्यानंतर अभिषेक अस्वस्थ झाला. गुगलवर टॅटूमुळे निवड करताना येणाऱ्या आव्हानांची माहितीही त्याने शोधली आणि टॅटू हटवण्याचे तंत्र, शक्यता आणि खर्चही शोधला. त्यानंतर हतबल झालेल्या अभिषेकने टोकाचा निर्णय घेतला.
अभिषेकच्या कुटुंबीयांनी त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात हत्येच्या कटाचा कोणताही सुगावा पोलिसांना मिळालेला नाही. आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांची पॉलीग्राफी चाचणीही करण्यात आली. काहीही चुकीचे आढळले नाही. अभिषेकने टॅटू काढल्यानंतर त्यांच्या फोनवर गुगल सर्च केल्याबद्दल कुटुंबीयांनीही न्यायालयाला माहिती दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"