Tauktae Cyclone: "ONGC कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला पेट्रोलियम मंत्री जबाबदार; पंतप्रधान मोदींनी राजीनामा घ्यावा"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 01:48 PM2021-05-21T13:48:42+5:302021-05-21T13:50:19+5:30
Tauktae Cyclone: शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र; पेट्रोलियम मंत्री, ओएनजीसीच्या एमडींचा मागितला राजीनामा
मुंबई: अरबी समुद्रात असलेल्या ओएनजीसीच्या बार्जला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. या प्रकरणी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि ओएनजीसीचे व्यवस्थापकीय संचालकांचा राजीनामा घ्या, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. यासंदर्भात सावंत यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. ओएनजीसी कंपनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अखत्यारित येते. मग राज्यात उठसूठ राजीनामे मागणारे मंत्री प्रधान यांचा राजीनामा का मागत नाहीत, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. (shiv sena mp arvind sawant seeks Petroleum Minister Dharmendra Pradhans resignation)
पंतप्रधान संवेदनशील, केंद्राने अधिकाधिक मदत करावी; उद्धव ठाकरेंची दाद अन् साद
'ओएनजीसीसारखी दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली असती, तर भाजपच्या नेत्यांनी सरकारमध्ये असलेल्या लोकांचे राजीनामे मागितले असते. ओएनजीसी पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येते. भाजप नेते धर्मेंद्र प्रधान या मंत्रालयाचे प्रमुख आहेत. मग आता भाजप नेते त्यांचा राजीनामा का मागत नाहीत? या मोठ्या जीवितहानीला जबाबदार कोण? त्यांना नुकसान भरपाई कोण देणार? केवळ एकमेकांकडे बोटं दाखवून काय होणार?' असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले.
हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही; प्रत्यक्ष जमिनीवर उतरलोय; मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला
Letter to Hon’ble @PMOIndia Shri. @narendramodi ji regarding The painful and sorrowful incident occurred on the Barge of ONGC which caused death of 23 employees & 57 employees of ONGC are missing (1/3)@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaCommspic.twitter.com/xrkdRvOt5C
— Arvind Sawant (@AGSawant) May 20, 2021
'तौक्ते चक्रीवादळाचा फटका समुद्रात असलेल्या ओनएसजीच्या बार्जला बसला. या दुर्दैवी घटनेत ओएनजीसीच्या २३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर ५७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. देशासाठी योगदान देणारी माणसं अशाप्रकारे गमवावी लागणं हे अतिशय दु:खद आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात यावी,' असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी पेट्रोलियम मंत्री आणि ओएनजीसीच्या एमडींचा तातडीनं राजीनामा घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.