तावडेंनी दहावीला डमी बसविल नवाब मलिक यांचा आरोप: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2015 11:57 PM2015-07-09T23:57:44+5:302015-07-09T23:57:44+5:30
मुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविला होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून तावडेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपी करा, अशी मागणीही केली आहे.
Next
म ंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविला होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून तावडेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपी करा, अशी मागणीही केली आहे.पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले,बोगस पदवी असणार्या शिक्षणमंत्र्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण यासारखी महत्वाची खाती आहेत. त्यामुळे या शिक्षणमंत्र्याच्या बोगसगिरीमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा होण्याची भीती वाटत आहे. ते म्हणाले, तावडे हे कोणतीही कायदेशीर मान्यता नसणार्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे अभिमानाने सांगत आहेत. ज्ञानेश्वर विद्यापीठ हे १२ वी फेल विद्यार्थांना इंजिनिअरच्या पदव्याचे वाटप करणारे विद्यापीठ होते. या विद्यापीठातूनच तावडे यांनी बोगस पदवी घेतली असून ते बारावी नापास आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला.तावडेंचे बोगस पदवीचे प्रकरण उघड होऊन देखील ते आपल्या फेसबुक पेज तसेच संबधीत संकेतस्थळावरील माहितीत ज्ञानेश्वर विद्यापीठातून बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स शिक्षण झाल्याचे दाखवत आहेत. विनोद तावडेंनी आता जनतेची ही फसवणूक बंद केली पाहिजे असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)........................मलिक यांनी आरोप सिध्द करावे- तावडे दहावीच्या परिक्षेत डमी उमेदवार बसवून पास झाल्याचे आणि बारावी च्या परीक्षेत मी नापास झाल्याचे नवाब मलिक यांनी सिध्द केले, तर मी राजकारण सोडून देईन, पण त्यांनी केलेला दावा जर ते सिध्द करु शकले नाहीत तर त्यांनी राजकारण सोडावे असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना दिले आहे.