नोटाबंदीनंतरही कर मोठया प्रमाणात गोळा झाला - अरुण जेटली
By admin | Published: January 9, 2017 12:40 PM2017-01-09T12:40:15+5:302017-01-09T15:05:06+5:30
एप्रिल ते डिसेंबर 2016 मध्ये अप्रत्यक्ष करामध्ये 25 टक्के, प्रत्यक्ष करामध्ये 12 टक्के आणि सेवा करामध्ये 24 टक्के वाढ झाली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - नोटाबंदीच्या निर्णयानंतरही एप्रिल ते नोव्हेंबर 2016 या कालावधीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर मोठया प्रमाणात गोळा झाला. याच कालावधीतील मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठया प्रमाणावर कर गोळा झाला आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
कर गोळा होण्याचे प्रमाण कमी झाल्याच्या बातम्या निराधार असून, मी सांगितलेले आकडे खरे असून गोंधळून जाण्यासारखी स्थिती नाही असे जेटलींनी सांगितले.
एप्रिल ते नोव्हेंबर 2016 मध्ये प्रत्यक्ष कर 12.1 टक्के जास्त जमा झाला. याच कालावधीत अप्रत्यक्ष कर 25 टक्के जास्त गोळा झाला. एप्रिल ते नोव्हेंबर 2016 मध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क कर गोळा होण्याचे प्रमाण 43 टक्क्यांनी वाढले. सेवा कर 23.9 टक्के तर सीमा शुल्क करात 4.1 टक्के वाढ झाली अशी माहिती जेटली यांनी दिली.