"भारतात कर इंग्लंडप्रमाणे वसूल केला जातो अन् सेवा...", AAP खासदार राघव चढ्ढा यांची केंद्र सरकारवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 20:40 IST2024-07-25T20:39:45+5:302024-07-25T20:40:17+5:30
चढ्ढा म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दुरवस्थेची तीन कारणं आहेत. पहिले कारण इकॉनॉमी आहे. दुसरे कारण इकॉनॉमी आहे आणि तिसरे कारणही इकॉनॉमीच आहे.

"भारतात कर इंग्लंडप्रमाणे वसूल केला जातो अन् सेवा...", AAP खासदार राघव चढ्ढा यांची केंद्र सरकारवर बोचरी टीका
आम आदमी पक्षाचे नेते तथा खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भारतात कर इंग्लंडप्रमाणे वसूल केला जातो. मात्र, सेवा सोमालियाप्रमाणे दिल्या जातात. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने कर लावत सर्वसामान्यांचे रक्त शोषले, असे राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे.
चढ्ढा म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दुरवस्थेची तीन कारणं आहेत. पहिले कारण इकॉनॉमी आहे. दुसरे कारण इकॉनॉमी आहे आणि तिसरे कारणही इकॉनॉमीच आहे.
रणजीत सिंग यांचे सिंहासन आणण्याची मागणी -
चढ्ढा म्हणाले, आज मी संसदेत महाराजा रणजित सिंगजी यांचे सिंहासन परत करण्याची मागणी केली आहे. जे सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहे. मी भारत सरकारकडे युनायटेड किंग्डमसोबतचे राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्याची विनंती केली.
चढ्ढा म्हणाले, त्यांच्या (महाराजा रणजित सिंगजी) महान शासनाने पंजाबला एकसंध केले. धर्मनिरपेक्ष मूल्ये, न्याय, समानता, सांस्कृतिक वारसा आणि सुशासन यांना प्रोत्साहन दिले. एवढेच नाही तर, महाराजा रणजित सिंगजी यांचा अतुलनीय वारसा आणि योगदानाचा आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्येही समावेश करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुशासनाबद्दल माहिती मिळू शकेल, अशी मागणीही आपण केल्याचे चढ्ढा यंनी सांगितले.