करदात्यांचा विश्वास संपादन करावा - वित्तमंत्री निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 23:54 IST2019-08-21T23:54:24+5:302019-08-21T23:54:54+5:30
सीतारामन यांनी सांगितले की, संयम हे आपले घोषवाक्य असावे. दोषींचा पाठपुरावा करा; पण अति ताणू नका. खटल्याांऐवजी तोडगा काढण्यावर भर द्या. खटल्यामुळे वेळ व पैसा वाया जातो. कर विभागात मोठे बदल होऊ घातले आहेत.

करदात्यांचा विश्वास संपादन करावा - वित्तमंत्री निर्मला सीतारामन
वाराणसी : करदात्यांचा विश्वास संपादन करण्याचे आवाहन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर अधिकाऱ्यांना केले आहे. करविषयक खटल्यांची संख्या कमी करून ‘चेहराविहीन संवादा’साठी (फेसलेस इंटरॅक्शन) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कर अधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादात त्यांनी म्हणाल्या की, तुम्ही उद्दिष्ट पूर्ण कराल, तेव्हा मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवीन आणि तुम्हाला पारितोषिकही देईन. करदात्यांच्या छळाची एकही घटना घडणार नाही, तेव्हाही मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवीन.
सीतारामन यांनी सांगितले की, संयम हे आपले घोषवाक्य असावे. दोषींचा पाठपुरावा करा; पण अति ताणू नका. खटल्याांऐवजी तोडगा काढण्यावर भर द्या. खटल्यामुळे वेळ व पैसा वाया जातो. कर विभागात मोठे बदल होऊ घातले आहेत. कर विभागाविरुद्ध मनमानी वागण्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विभागाला मैत्रीपूर्ण चेहरा असावा. दसºयापर्यंत कर विभाग १00 टक्के ‘चेहराविहीन व्यवस्था‘ बनायला हवा. (वृत्तसंस्था)