वर्षभरापूर्वी लग्न, भांडण अन् मग शेवट...; TCS च्या मॅनेजरने पत्नीच्या छळाला कंटाळून स्वतःला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:15 IST2025-02-28T16:11:13+5:302025-02-28T16:15:26+5:30

Agra Suicide Case: पत्नीच्या छळाला कंटाळून एका तरुणाने लाइव्ह व्हिडिओ बनवून आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आलं आहे.

TCS manager blamed his wife and in laws before end his life | वर्षभरापूर्वी लग्न, भांडण अन् मग शेवट...; TCS च्या मॅनेजरने पत्नीच्या छळाला कंटाळून स्वतःला संपवलं

वर्षभरापूर्वी लग्न, भांडण अन् मग शेवट...; TCS च्या मॅनेजरने पत्नीच्या छळाला कंटाळून स्वतःला संपवलं

Manav Sharma Death Case:उत्तर प्रदेशातीलआग्रा येथे पत्नीच्या छळाला कंटाळून एका तरुणाने लाइव्ह व्हिडिओ बनवत आत्महत्या केली. व्हिडिओमध्ये तरुणाने मी या छळाला कंटाळलो आहे, कुणीतरी पुरुषांचाही विचार करायला हवा असं म्हणत गळफास घेतला. एका प्रतिष्ठित काम करणाऱ्या तरुणाच्या आत्महत्येची देशभरात चर्चा सुरु झाली आहे. तरुणाने  त्याच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये पत्नी आणि सासरच्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. व्हिडीओमध्ये त्याने पत्नीच्या वागण्यावर आणि चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

टीसीएस कंपनीत मॅनेजर पोस्टवर असलेल्या मानव शर्माने आग्रा येथे गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मानवने एक व्हिडीओ बनवला ज्यामध्ये त्याने पत्नीच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले. माझ्या पत्नीचे अफेअर असल्याचेही मानवने सांगितले. मानवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून चर्चेचा विषय बनला आहे. रडत रडत मानवने ज्या प्रकारे त्याच्यासोबत घडलेल्या घटना सांगितल्या त्यामुळे पुन्हा एकदा अतुल सुभाष प्रकरणाची सर्वांना आठवण झाली. 

आत्महत्या करण्यापूर्वी मानव शर्माने आपल्या व्हिडीओमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळल्याचे सांगितले होते. कोणीतरी पुरुषांबद्दल बोलले पाहिजे. गरीब माणूस खूप एकटा आहे. पप्पा सॉरी, मम्मी सॉरी, अक्कू सॉरी. मी निघून गेल्यावर सर्व काही ठीक होईल, असं मानवने शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटलं. मानवच्या वडिलांनी सून आणि तिच्या माहेरच्या कुटुंबाला जबाबदार धरले आहे. मानवने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितले की त्याची पत्नी मुंबईत तिच्या प्रियकरसोबत राहते. यावेळी मानवने पत्नीच्या चारित्र्याविषयीसुद्धा गंभीर आरोप केले.

२३ फेब्रुवारी रोजी सून आणि मुलगा मुंबईहून घरी आले होते. त्याच दिवशी मानव पत्नीला सोडण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मानवला त्याच्या सासरच्यांनी धमकावले होते. दुसऱ्या दिवशी त्याने पहाटे पाच वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही त्याला लष्करी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले, असं मानवचे वडील नरेंद्र शर्मा यांनी म्हटलं.

पत्नीने फेटाळले आरोप

मानवचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची पत्नी निकीतानेही एक व्हिडीओ पोस्ट करत या सगळ्या प्रकाराबाबत भाष्य केलं. मानव जे म्हणाला ते माझ्या भूतकाळात घडले होते. पण लग्न झाल्यापासून तसे काहीच नाही. मानवने दारूच्या नशेत असताना मला मारहाण केली होती, ज्याची माहिती मी सासरे आणि त्याच्या भावाला दिली होती, असं निकीताने म्हटलं.

Web Title: TCS manager blamed his wife and in laws before end his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.