आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचे मेहुणे नंदमुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 08:41 AM2018-08-29T08:41:01+5:302018-08-29T10:00:13+5:30
दक्षिणेतील अभिनेते, तेलुगू देसम पक्षाचे नेते नंदामुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला.
हैदराबाद - दक्षिणेतील अभिनेते आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते नंदामुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. 61 वर्षीय हरिकृष्णा हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे मेहुणे आणि माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते एन.टी. रामाराव यांचे पुत्र होते.
आज सकाळी नलगोंडा जिल्ह्यातील नरकटपल्ली-अदांकी महामार्गावरून जात असताना हरिकृष्णा यांच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
#SpotVisuals: Actor and TDP leader Nandamuri Harikrishna dies in a car accident in Telangana's Nalgonda district. pic.twitter.com/4EusxbqXmw
— ANI (@ANI) August 29, 2018
नलगोंडाचे एसपी एव्ही रंगनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अपघात झाला तेव्हा हरिकृष्णा हे स्वत: कार चालवत होते. अपघात झाल्यानंतर हरिकृष्णा यांना कामिनेनी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Actor and TDP leader Nandamuri Harikrishna who died in a car accident in Telangana's Nalgonda district, today. pic.twitter.com/fTjHxLGIbb
— ANI (@ANI) August 29, 2018
हरिकृष्णा यांचे दोन मुलगे ज्युनिअर एनटीआर आणि नंदमुरी कल्याणराम हे तेलुगू चित्रपट सृष्टीमधील आघाडीचे नट आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हरिकृष्णा यांचा मुलगा नंदमुरी जानकीराम यांचाय 2014 साली रस्ते अपघातातच मृत्यू झाला होता. तसेच ज्युनिअर एनटीआरसुद्धा 2009 साली एका रस्ते अपघातात थोडक्यात बचावले होते.