आंध्र प्रदेशात YSRC आणि TDP कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एका नेत्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 04:09 PM2019-04-11T16:09:20+5:302019-04-11T16:10:19+5:30

आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मारहाणीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.  

TDP leader S Bhaskar Reddy killed in clashes in Tadipatri town of Anantapur | आंध्र प्रदेशात YSRC आणि TDP कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एका नेत्याचा मृत्यू 

आंध्र प्रदेशात YSRC आणि TDP कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एका नेत्याचा मृत्यू 

Next

हैदराबाद : आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मारहाणीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.  

अनंतपूरमधील ताडीपत्रीमध्ये वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देशम पक्ष (टीडीपी) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एका टीडीपी नेता एस. भास्कर रेड्डी यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांच्यासह 10 जण जखमी झाले आहेत. याशिवाय, राज्यात अनेक ठिकाणी तुंबळ हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या. यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतपूर जिल्हातील ताडीपत्री विधानसभा मतदार संघात टीडीपी नेता एस. भास्कर रेड्डी यांच्यावर वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कथितरित्या हल्ला करुन त्यांनी हत्या केल्याचा आरोप आहे. या मतदार संघातील देवापुरम या गावी कार्यकर्त्यांनी हाणामारी झाली. यात एस. भास्कर रेड्डी जमखी झाले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.


याशिवाय, गुंटूर आणि प्रकाशम जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणानी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झुंबड उडाल्याचे समजते. तर, बंदरापल्ली येथील पुथालापट्टूमध्ये वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 




 

Web Title: TDP leader S Bhaskar Reddy killed in clashes in Tadipatri town of Anantapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.