टीडीएसचा महसूल ५0 टक्क्यांनी घटला

By Admin | Published: February 4, 2015 01:43 AM2015-02-04T01:43:19+5:302015-02-04T01:43:19+5:30

स्रोतावर कर कपातीद्वारे (टीडीएस) मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाल्यामुळे चिंतित झालेला आयकर विभाग कराची थकबाकी ठेवणाऱ्यांविरोधात गतिमान कारवाई करणार आहे.

TDS revenue reduced by 50 percent | टीडीएसचा महसूल ५0 टक्क्यांनी घटला

टीडीएसचा महसूल ५0 टक्क्यांनी घटला

googlenewsNext

नवी दिल्ली : स्रोतावर कर कपातीद्वारे (टीडीएस) मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाल्यामुळे चिंतित झालेला आयकर विभाग कराची थकबाकी ठेवणाऱ्यांविरोधात गतिमान कारवाई करणार आहे. यासाठी आपल्या विशेष इलेक्ट्रॉनिक डाटाबेस आणि प्रसंस्करण केंद्राची मदत विभाग घेणार आहे.
आयकर विभागाचे टीडीएसशी संबंधित केंद्रीय प्रसंस्करण केंद्र गाजियाबाद येथे आहे. वेळच्या वेळी टीडीएसचा भरणा न करणाऱ्या करदात्यांची माहिती आयकर विभागास कळविण्याची जबाबदारी या केंद्राकडे आहे. यंदा टीडीएसचा भरणा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५0 टक्क्यांनी कमी झाला आहे. १ लाखापेक्षा जास्त रकमेचा टीडीएस थकविणाऱ्यावर कारवाई करणे नियमानुसार आवश्यक आहे. यंदा वेळेत टीडीएस भरणा न करणाऱ्या करदात्यांची यादी महिनाभरात करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
(वृत्तसंस्था)

Web Title: TDS revenue reduced by 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.