चहाचे डोंगर
By Admin | Published: January 7, 2017 05:00 AM2017-01-07T05:00:22+5:302017-01-07T05:00:22+5:30
जगात सर्वात जास्त चहाची लागवड होणाऱ्या तमिळनाडूतील कोलुक्कुमलार्ई डोंगरांवर चहा घेण्याचा आनंद काही औरच.
कोलुक्कुमलाई : जगात सर्वात जास्त चहाची लागवड होणाऱ्या तामिळनाडूतील कोलुक्कुमलार्ई डोंगरांवर चहा घेण्याचा आनंद काही औरच. येथे पिकणाऱ्या चहाची चव व ताजेपणा काही वेगळाच आहे. अर्थात त्याचे श्रेय जाते ते या अतिशय उंचावरील प्रदेशाला.
येथील कारखान्याला गाईडची मदत घेऊन भेट द्या. त्याची इमारत दोन मजली व तिचे बांधकाम झाले ते १९३० मध्ये. त्याचा आतील भाग लाकूड वापरून सजवण्यात आला आहे. काळाच्या कसोटीवर उतरलेल्या काही चहा बनवण्याच्या पद्धती तुम्हाला येथे दिसतील. येथे पारंपरिक पद्धतीने चहावर प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया अधिक लोकप्रिय असलेल्या सीटीसी (क्रश-टियर-कर्ल पद्धत) पद्धतीपेक्षा वेगळी आहे. येथील चहाची चाचणी घेणाऱ्या केंद्रात वेगवेगळ््या चहांची चव घेण्याचा मोह चहाचाहत्यांना होईल. कोलुक्कुमलाई समुद्रसपाटीपासून ७,९०० फुटांवर असून तेथून तमिळनाडुच्या सीमेवरील सपाट भागांचे विहंगम दृश्य बघता येईल.
लागवड झालेल्या शेतातून पायी चालण्याचा आनंद तुम्ही लुटू शकता. फक्त घोडेच जाऊ शकतील अशा चढाच्या मार्गाने जाताना तुम्हाला त्याचा दरारा वाटतो. हाच एकमेव मार्ग चहाच्या मळ््यांत काम करणाऱ्या कामगारांसाठी चहाच्या टोपल्या व किराणा सामान आणण्यासाठी आहे. कुलुक्कुमलाई हे मुन्नारपासून २८ किलोमीटरवर आहे. या डोंगरावर फक्त जीपनेच जाता येते व तो प्रवास दीड तासाचा आहे.