विद्यार्थ्यांना देशहित शिकवा !
By Admin | Published: September 6, 2015 12:49 AM2015-09-06T00:49:30+5:302015-09-06T00:49:30+5:30
शिक्षक ज्ञानदान करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना देशसेवा, देशप्रेमाचे बाळकडू देत असतात. वर्तमान स्थितीत कलुषित झालेले वातावरण पाहता जात, धर्म व वंशाच्या पलीकडे जाऊन
नवी दिल्ली : शिक्षक ज्ञानदान करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना देशसेवा, देशप्रेमाचे बाळकडू देत असतात. वर्तमान स्थितीत कलुषित झालेले वातावरण पाहता जात, धर्म व वंशाच्या पलीकडे जाऊन देशहित जोपासण्याची भावना शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. राष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी महाराष्ट्रातील ३१ शिक्षकांसह देशभरातील एकूण ३७८ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती म्हणाले, की शिक्षक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्रीद्वय उपेंद्र कुशवाह, प्रा. राम शंकर कठेरीया यांनीही संबोधित केले. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांमधे राज्यातील प्राथमिक शाळांतील १८, तर माध्यमिक शाळांतील ८ शिक्षकांचा समावेश आहे. विशेष श्रेणीतील पुरस्कारांत राज्यातील प्राथमिक शाळांचे २ व माध्यमिक शाळेच्या १ शिक्षकाला सन्मानित करण्यात आले. एका शिक्षकाला ‘आयसीटी’ व अन्य एका शिक्षकाला ‘सीआईएससीई’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५० हजार रुपये रोख, रौप्यपदक व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (विशेष प्रतिनिधी)