शिक्षक तीन तास ताटकळले अपंगत्वासंबंधी तपासणीला बोलावले : विद्यानिकेतनमध्ये झाले घामाघूम
By admin | Published: May 11, 2016 10:15 PM2016-05-11T22:15:48+5:302016-05-11T22:15:48+5:30
जळगाव : अपंगत्व, आजारपण याचे कारण देऊन बदली प्रक्रियेतून वगळलेल्या, विनंती बदलीस पात्र असलेल्या जिल्हाभरातील सुमारे ३०० शिक्षकांना बुधवारी शहरातील विद्यानिकेतन विद्यालयामध्ये जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने बोलावले होते. सकाळपासून त्यासाठी शिक्षक आले, परंतु वेळेत ही कार्यवाही न झाल्याने ते सुमारे तीन तास ताटकळत बसून होते.
Next
ज गाव : अपंगत्व, आजारपण याचे कारण देऊन बदली प्रक्रियेतून वगळलेल्या, विनंती बदलीस पात्र असलेल्या जिल्हाभरातील सुमारे ३०० शिक्षकांना बुधवारी शहरातील विद्यानिकेतन विद्यालयामध्ये जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने बोलावले होते. सकाळपासून त्यासाठी शिक्षक आले, परंतु वेळेत ही कार्यवाही न झाल्याने ते सुमारे तीन तास ताटकळत बसून होते. पाल्याचे अपंगत्व, स्वत:चे आजारपण, अपंगत्व आदी कारणांमुळे शिक्षकांनी विनंती बदली व बदली प्रक्रियेतून वगळण्याचे अर्ज केले आहेत. यासंदर्भात संबंधितांनी प्रमाणपत्र दिले आहेत. तशा नोंदी सेवा पुस्तिकेमध्येही आहेत. परंतु असे असताना संबंधित शिक्षक अपंग आहेत का, त्यांनी दिलेली कारणे खरी आहेत की खोटी याची शहानिशा करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे संबंधितांना विद्यानिकेतन विद्यालयात बोलावले होते. सकाळी १० वाजता त्यासाठी शिक्षक या विद्यालयात आले. परंतु तपासणीसंबंधी कर्मचारीच आले नाहीत. यामुळे शिक्षक ताटकळत बसले होते. सुमारे तीन तास प्रतीक्षा करूनही त्यांची तपासणी झाली नाही. ऐनवेळी १३ तारीख दिलीतपासणीसंबंधि शिक्षक वेळेत आले, पण आता येत्या १३ रोजी यासंबंधीची तपासणी होईल, असे कारण शिक्षकांना सांगण्यात आले. त्यामुळे ते पुन्हा माघारी फिरले. या चुकीच्या नियोजनाचा फटका शिक्षकांना बसला.