शिक्षिकेचा वर्गात डान्स; पैसेही उधळले, व्हिडीओ व्हायरल, सहा शिक्षकांना केले निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:14 AM2020-03-04T04:14:13+5:302020-03-04T04:14:29+5:30
सरकारी शाळेतील शिक्षिकेने सपना चौधरी हिच्या ‘तेरी आख्योंका यो काजल’ या प्रसिद्ध गाण्यावर शाळेतीलच बंद खोलीत नाच केला.
आग्रा : सरकारी शाळेतील शिक्षिकेने सपना चौधरी हिच्या ‘तेरी आख्योंका यो काजल’ या प्रसिद्ध गाण्यावर शाळेतीलच बंद खोलीत नाच केला. तिच्या या नाचाच्या वेळी तिचे सहकारी पुरुष व शिक्षिकांनी तिच्यावर नोटांचा दौलतजादा केला. या नाचाचा तीन मिनिटांचा व्हिडिओ ऑनलाईन व्हायरलही झाला आहे.
नारखी (जिल्हा आग्रा) गटात गौरीशंकर डिग्री कॉलेज आॅफ कुटुकपूर छानुरा खेड्यात हा व्हिडिओ तयार झाला आहे. या शिक्षिकेने गिरक्या घेत अत्यंत उत्साहात हा नाच केला. त्याचे चित्रीकरण तिचे काही सहकारी करीत होते तर काही जण तिच्यावर नोटांची उधळण करीत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नाच करणाऱ्या शिक्षिकेसह सहा शिक्षकांना फिरोजाबादच्या प्राथमिक शिक्षण अधिकाºयाने निलंबित केले आहे.
केंद्र सरकारच्या पुढाकाराने पाच दिवसांचा ‘निष्ठा’ (नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेडस अँड टीचर्स होलिस्टिक अॅडव्हान्समेंट) कार्यक्रम किमान १५० प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता. एकात्मिक प्रशिक्षणातून शालेय शिक्षणाची क्षमता वाढवण्याचा त्यामागे हेतू होता. ‘निष्ठा’ कार्यक्रमाला सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत हजर राहणाऱ्यांसाठी भोजनानंतर वर्गात शिक्षकांच्या एका गटाने नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. (वृत्तसंस्था)