Heart Attack News हृदयद्रावक! शाळेत प्रार्थने दरम्यान 23 वर्षीय शिक्षकाला आला हार्ट अटॅक; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 12:21 PM2022-12-05T12:21:20+5:302022-12-05T12:51:02+5:30

Teacher died of Heart Attack during prayer in school in bareilly Uttar Pradesh : हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या बरेलीच्या शिक्षकाचं वय हे फक्त 23 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे.

teacher died of heart attack during prayer in school in bareilly uttar pradesh | Heart Attack News हृदयद्रावक! शाळेत प्रार्थने दरम्यान 23 वर्षीय शिक्षकाला आला हार्ट अटॅक; झालं असं काही...

Heart Attack News हृदयद्रावक! शाळेत प्रार्थने दरम्यान 23 वर्षीय शिक्षकाला आला हार्ट अटॅक; झालं असं काही...

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळेत सुरू असलेल्या प्रार्थनेदरम्यान एका शिक्षकाला हार्ट अटॅकचा आल्याची घटना घडली आहे. यामध्ये शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या बरेलीच्या शिक्षकाचं वय हे फक्त 23 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने शिक्षकाचा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जेके स्कूल एकॅडमीमध्ये गोविंद देवल हा 23 वर्षीय तरुण शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने प्रार्थनेसाठी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र जमवलं. प्रार्थना सुरू असतानाच अचानक शिक्षकाची तब्येत बिघडली. यामुळे शाळेत उपस्थित असलेले शिक्षक आणि विद्यार्थी हे घाबरले. शाळेतील इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने गोविंदला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. 

गोविंदला हार्ट अटॅक आला आहे असं सांगून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मेडिकल कॉलेज येथे पाठवलं. मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांनी गोविंदला मृत घोषित केलं. दोन बहिणींचा गोविंद हा सर्वात लहान भाऊ होता. त्याच्या मृत्यूने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हार्ट अटॅकच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: teacher died of heart attack during prayer in school in bareilly uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.