विद्यार्थ्यासोबत जुळले सूर, शिक्षिका पळाली घरातून
By admin | Published: January 28, 2017 01:46 PM2017-01-28T13:46:42+5:302017-01-28T13:48:21+5:30
कायदेशीरदृष्टया या शिक्षिकेवर अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याचा आरोप ठेवता येऊ शकतो पण पोलिसांनी फक्त बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 28 - शाळेत शिकवणारी शिक्षिकाच विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची एक घटना जुन्या हैदराबाद शहरात घडली आहे. 18 जानेवारीची ही घटना आहे. शिक्षिकेच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर कामाठीपूरा पोलिसांनी केलेल्या तपासातून शिक्षिका विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची माहिती समोर आली.
कायदेशीरदृष्टया या शिक्षिकेवर अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याचा आरोप ठेवता येऊ शकतो पण पोलिसांनी फक्त बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. 22 जानेवारीला समरीन जहानच्या वडिलांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कामाठीपूरा पोलिस स्थानकात दाखल केली. समरीन 20 वर्षांची आहे.
कोणाला काहीही न सांगता मुलीने 18 जानेवारीला दुपारी 12.30 वाजता घर सोडले असे तिच्या वडिलांनी सांगितले. समरीनच्या वडिलांनीच विद्यार्थ्यावर संशय व्यक्त केला होता. समरीन त्या मुलाला शिकवत होती आणि त्याच्यासोबतच पळून गेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
समरीन गायब झाल्यानंतर तिने सुरुवातीला तिचा मोबाईल फोन स्विच ऑफ केला होता. समरीन आणि तिच्या बहिणीमध्ये व्हॉटस अॅपवरुन झालेल्या संवादावरुन पोलिसांनी दोघांना दिल्लीतून ताब्यात घेतले. कुटुंबियांनी आणि पोलिसांनी समरीन आणि तिच्यासोबत पळालेल्या मुलाची समजूत घालून दोघांना पुन्हा हैदराबादला पाठवले.