सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 04:37 PM2020-08-12T16:37:50+5:302020-08-12T16:50:12+5:30

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या संकटात अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

teacher travels100 km to distribute books to his students | सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं

फोटो - Indian Express

Next

नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. तर दुसरीकडे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या संकटात अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील लाखो विद्यार्थी हे शाळेत न जाता सध्या घरबसल्या अभ्यास करत आहेत. याच दरम्यान तेलंगणातील एक शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी तब्बल 100 किलोमीटरहून अधिक प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. आतापर्यंत 13 गावांतील घरांमध्ये जाऊन मुलांना नवीन पुस्तकं दिली आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला असून पालकांना मदतीचा हात दिला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, के. मूर्ती (K Moorthi) असं या शिक्षकाचं नाव असून ते तेलंगणातील एका शाळेत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं देता यावीत यासाठी त्यांनी 100 किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्यांनी 13 गावांतील 57 विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना अभ्यास करणं सोपं व्हावं यासाठी पुस्तकं दिली आहेत. मूर्ती यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

'मुलांसाठी शाळेत पुस्तकं पाठवण्यात आली होती. मात्र कोरोनामुळ सर्व बंद असल्याने त्यांच्यापर्यंत ती पोहवण्यासाठी काही समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच स्वत: विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पुस्तकं देण्याचा निर्णय घेतला. तसेच काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पुस्तकातील काही धडेही शिकवले' अशी माहिती मूर्ती यांनी दिली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

कडक सॅल्यूट! ...अन् गर्भवती महिलेसाठी आमदार ठरले देवदूत, डॉक्टरांच्या अनुपस्थितीत केली प्रसूती

बापरे! बाईक दिली नाही म्हणून 'तो' 100 फूट उंच विजेच्या खांबावर चढला अन्..

Corona Vacine : 20 वर्षांपासूनच्या शोधाची कमाल; रशियाकडून SputnikV वेबसाईट लाँच

भयंकर! धावत्या बसने अचानक घेतला पेट; 5 जणांचा होरपळून मृत्यू, 27 जण जखमी

"ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र

"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी

बंगळुरू पेटलं! शहरात कलम 144 लागू; पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी 110 जणांना अटक

Web Title: teacher travels100 km to distribute books to his students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.