धोनी बनणार शिक्षक, CISF च्या जवानांना देणार शिष्टाचाराचे धडे

By admin | Published: September 28, 2015 12:25 PM2015-09-28T12:25:18+5:302015-09-28T12:25:18+5:30

विमानतळावरील सुरक्षा कर्मचा-यांना शिष्टाचार व चांगल्या वागणुकीचे धडे देण्यासाठी दस्तुरखुद्द महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला आहे.

Teachers to become Dhoni, teachings of courtesy to CISF jawans | धोनी बनणार शिक्षक, CISF च्या जवानांना देणार शिष्टाचाराचे धडे

धोनी बनणार शिक्षक, CISF च्या जवानांना देणार शिष्टाचाराचे धडे

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ - विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी प्रवाशांसोबत उद्धटपणाने वागतात अशी अनेक प्रवाशांची तक्रार असते. मात्र आता सुरक्षा कर्मचा-यांना शिष्टाचार व चांगल्या वागणुकीचे धडे देण्यासाठी दस्तुरखुद्द महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) धोनी, विश्वनाथन आनंद व धनराज पिल्ले या तिघांकडे कर्मचा-यांना शिष्टाचाराचे प्रशिक्षण देण्याची धूरा सोपवली आहे. 

देशभरातील विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे (सीआयएसएफ) आहे. मात्र सीआयएसएफचे जवान विमानतळावरील प्रवाशांसी सौजन्याने वागत नाही, त्यांच्याशी उद्धटपणे वागतात अशी अनेकांची तक्रार आहे. या तक्रारीची सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिका-यांनी दखल घेतली आहे. आमचे जवान १२ ते १४ तास काम करत असल्याने त्यांच्यावरील तणाव वाढतो व त्यामुळेच ते असे वर्तन करत असावे असे अधिका-यांचे म्हणणे आहे. सीआयएसएफने काही दिवसांपूर्वी विमानतळावर नेमलेल्या जवानांसाठी शिष्टाचारासंदर्भात प्रशिक्षण वर्गही घेतला होतेे. मात्र या वर्गाला जवानांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस सीआयएसएफने धोनी, धनराज पिल्ले व विश्वनाथन आनंद यासारख्या खातनाम सेलिब्रिटी खेळाडूंना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. शिष्टाचार, चांगली वर्तवणुकीसोबतच जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रेरणादायी भाषण देण्यास या तिघांना सांगण्यात आले आहे. 

महेंद्रसिंह धोनीने नुकतेच रांची विमानतळावरील सीआयएसएफचे जवानांचा संबोधित केले. यात धोनीने त्याचे विमानतळावरील अनुभव सांगितले. परदेशी पर्यटक पहिले तुम्हालाच सामोरे जातात, त्यामुळे तुमच्या वागणुकीवरच देशाची प्रतिमा अवलंबून असते अशी जाणीव धोनीने सीआयएसएफच्या कर्मचा-यांना करुन दिली. 

Web Title: Teachers to become Dhoni, teachings of courtesy to CISF jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.