शिक्षकसंघाची जिल्हास्तरीय कार्यशाळा
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:01+5:302014-12-20T22:27:01+5:30
अहमदनगर : लारार फॉर बुण्डेट ऑफ स्वीडन, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यांच्या सौजन्याने शिक्षकांच्या संघटनात्मक विकास या विषयावर दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २२ ते २३ डिसेंबर ऐक्य मंदिर, प्राथमिक शिक्षक बँक या ठिकाणी होणार असल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निमसे आणि लक्ष्मण चेमटे यांनी दिली.
Next
अ मदनगर : लारार फॉर बुण्डेट ऑफ स्वीडन, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यांच्या सौजन्याने शिक्षकांच्या संघटनात्मक विकास या विषयावर दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २२ ते २३ डिसेंबर ऐक्य मंदिर, प्राथमिक शिक्षक बँक या ठिकाणी होणार असल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निमसे आणि लक्ष्मण चेमटे यांनी दिली. कार्यशाळेत जिल्ह्यातील २५ निवड शिक्षक- शिक्षिकांना राज्यस्तरीय मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. यात विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यात शिक्षकांची भूमिका, शिक्षकांची सेवाशर्ती व नियम, शिक्षकांचा हक्क, कर्तव्य व आचार संहिता, नेतृत्व गुण, निर्णयक्षमता व संवाद कौशल्य बालश्रम निर्मुलन व मुलींचे शिक्षण या विषयावर चर्चा होणार आहे. कार्यशाळेला येणार्या शिक्षकांना येण्या-जाण्याचा खर्च, भोजन व लेखन साहित्याचा खर्च हा संघटनेकडून दिला जाणार आहे. कार्यशाळा यशस्वी करण्याचे आवाहन बाळासाहेब कदम, कल्याण लवांडे, शरद वांढेकर, विष्णू बांगर, सर्जेराव राऊत यांनी केले आहे. ...............