PSTEST: मस्करी करता काय राव... शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरच आधीपासूनच बरोबर उत्तरांपुढे केली होती Tick

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 11:00 PM2023-03-12T23:00:10+5:302023-03-12T23:00:38+5:30

घडलेला प्रकार पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला

teachers eligibilty Test in punjab correct answers already ticked in question paper students go crazy | PSTEST: मस्करी करता काय राव... शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरच आधीपासूनच बरोबर उत्तरांपुढे केली होती Tick

PSTEST: मस्करी करता काय राव... शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरच आधीपासूनच बरोबर उत्तरांपुढे केली होती Tick

googlenewsNext

Punujab PSTEST: पंजाब राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (पीएसटीईटी) रविवारी घेण्यात आली. राज्यातील काही केंद्रांमध्ये या काळात वेगळेच प्रकरण समोर आले. परीक्षार्थींना वाटण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांपैकी ६० टक्के प्रश्नांवर आधीच योग्य उत्तरांवर बरोबरच्या खूणा (tick) करण्यात आली होती. ही विचित्र घटना पाहून विद्यार्थीही आश्चर्यचकित झाले कारण ही घटना फारच अनोखी होती. सुरुवातीला विद्यार्थ्यांना वाटले की प्रश्नपत्रिकेत मिस प्रिंट आली असावी, पण एकामागून एक अनेक प्रश्नांवर टिक्स पाहिल्यावर त्यांना ही बाब समजली.

पंजाब सरकारने रविवारी पंजाब राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (पीएसटीईटी) आयोजित केली होती. मात्र यादरम्यान सामाजिक अभ्यास विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अचूक उत्तरे आधीच खूण केल्याने परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना आश्चर्याचा धक्का बसला. एवढेच नाही तर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी इतरही तक्रारी केल्या आहेत. प्रश्नपत्रिकेत ठळक मजकुरात उत्तरे शेअर करण्यात आली होती, असे एका उमेदवाराने सांगितले.

आणखी एका परीक्षार्थीने नाव न सांगता सांगितले की, पंजाबी भाषेतील अनुवादित प्रश्नांमध्ये अनेक चुका होत्या. चुकीच्या शब्दांबरोबरच वाक्प्रचारांचे संदर्भ, अर्थ आणि वापरही बरोबर नव्हता. परीक्षार्थी पुढे म्हणाला, "प्रश्नपत्रिका देणाऱ्या व्यक्तीच अशा चुका करत असतील तर ते संबंधित अधिकारी उमेदवारांच्या क्षमतेची चाचणी कशी घेत आहेत याची मला लाज वाटते." दुसर्‍या उमेदवारानेही खिल्ली उडवली की पेपर काढणारे घाईत होते. ते म्हणाले, अनेक केंद्रांवर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकाही काढण्यात आल्या. ते म्हणाले, पीएसटीईटी परीक्षेसाठी जाहिरात करणे, अर्ज मागवणे आणि परीक्षा आयोजित करणे ही संपूर्ण प्रक्रिया १८ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यान झाली. ही परीक्षा घेण्याची अधिकाऱ्यांना इतकी घाई होती का, की त्यांनी उत्तरेही टिक करून दिली.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावर योग्य कारवाई होईल असे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

Web Title: teachers eligibilty Test in punjab correct answers already ticked in question paper students go crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.