...तोपर्यंत देशातलं आरक्षण कायम ठेवावं; संघानं स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 03:18 AM2019-09-10T03:18:51+5:302019-09-10T08:07:16+5:30
ज्यांना अरक्षणाचे फायदे मिळतात व ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यात सलोख्याच्या वातावरणात चर्चा-संवाद व्हायला हवा, अ
पुष्कर (राजस्थान) : समाजात अजूनही सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम असल्याने त्याआधारे दिले जाणारे आरक्षण लाभार्थींना त्याची गरज वाटते तोपर्यंत सुरु ठेवायला हवे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोमवारी म्हटले.
संघाची ही भूमिका एका पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी असेही सांगितले की, मंदिरे, स्मशानभूमी व विहिरी आणि पाणवठे कोणत्याही एका समाजवर्गासाठी नव्हे तर सर्व जाती-धर्मांसाठी खुले असायला हवेत. होसबळे म्हणाले की, समाजात अजूनही विषमता असल्याने राज्यघटनेनुसार ठरलेल्या आरक्षणास संघाचा संपूर्ण पाठिंबा आहे.
ज्यांना अरक्षणाचे फायदे मिळतात व ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यात सलोख्याच्या वातावरणात चर्चा-संवाद व्हायला हवा, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलिकडेच सुचविले होते. त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरु झाली होती. आरक्षण अनिश्चित काळ सुरु राहावे, असे संघाला वाटते की, असे विचारता होसबळे यांनी सांगितले की, या व्यवस्थेचा ज्यांना लाभ मिळतो त्यांनी याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यांना गरज वाटते तोपर्यंत आरक्षण सुरु राहायला हवे.समाजातील विषमता व पक्षपाती वागणूक संपुष्टात आणण्याच्या बाबतीत संघाने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करणारे पत्र एका दलित संघटनेने सरसंघचालकांना पाठविले आहे, असे सांगून ते म्हणाले की, मंदिरे, स्मशानभूमी आणि पाणवठे कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी खुले असायला हवेत.