तंत्रज्ञानाने बदलले गावकऱ्यांचे आयुष्य

By admin | Published: February 3, 2015 02:18 AM2015-02-03T02:18:52+5:302015-02-03T02:18:52+5:30

पिण्याशिवाय पर्याय नव्हता़ पण आज हेच गाव तलावातील पाणी शुद्ध व सुरक्षित बनवून आजूबाजूच्या गावखेड्यांना विकत आहे़ नव्या तंत्रज्ञानाने या गावाचा कायापालट घडवून आणला आहे़

Technology changed lives of the villagers | तंत्रज्ञानाने बदलले गावकऱ्यांचे आयुष्य

तंत्रज्ञानाने बदलले गावकऱ्यांचे आयुष्य

Next

गायघाट(प.बंगाल) : भारत-बांगलादेशाच्या सीमेनजीकच्या मधुसूदनकटी या गावातील लोकांना कधीकाळी आर्सेनिकयुक्त पाणी पिण्याशिवाय पर्याय नव्हता़ पण आज हेच गाव तलावातील पाणी शुद्ध व सुरक्षित बनवून आजूबाजूच्या गावखेड्यांना विकत आहे़ नव्या तंत्रज्ञानाने या गावाचा कायापालट घडवून आणला आहे़
फ्रान्सच्या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून गावाच्या मधुसूदनकटी समाबय कृषी उन्नयन समिती या सहकारी सोसायटीने एक जलशुद्धीकरण प्रकल्प स्थापन केला आहे़ तलावातील आर्सेनिकयुक्त प्रदूषित पाणी सुरक्षित व शुद्ध पेयजलात बदलण्याचे कार्य या प्रकल्पात होते़ आता मधुसूदनकटीमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे़ एवढेच नव्हे तर ५० रुपये प्रति लीटर भावाने उत्तरी २४ परगणा जिल्ह्यातील आजूबाजूच्या गावांनाही ही सोसायटी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहे़
सोसायटीचे अध्यक्ष हलधर शर्मा यांनी सांगितले की, सध्या या प्रकल्पात रोज दोन हजार लीटर पाणी शुद्ध केले जाते आणि ते ‘सुलभ जल’ या बॅनरखाली बाटल्यांमध्ये भरून विकले जाते़ गावाबाहेरचे २०० कुटुंबे आता गावातून पाणी विकत घेतात. सुलभ इंटरनॅशनलने या प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली आहे़ २० लाख रुपयांचा हा प्रकल्प सुलभ इंटरनॅशनल, ‘१००१ फॉऊंटेन’ ही फ्रेंच संघटना आणि गावकऱ्यांच्या योगदानातून उभा राहिला़ (वृत्तसंस्था)

४पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा यासह ९ जिल्ह्यांतील भूजल साठा आर्सेनिकयुक्त आहे़

४ग्रामीण भागातील १़६ कोटी आणि नागरी क्षेत्रातील १़२ कोटी लोक यामुळे प्रभावित आहेत़

४जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दीर्घकाळ आर्सेनिकयुक्त पाणी पिल्यामुळे त्वचेचा कर्करोग, किडनी आणि फुफ्फुसासह अन्य आजार होऊ शकतात़

Web Title: Technology changed lives of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.