प्रियजनांच्या शोधाला तंत्रज्ञानाची साथ
By Admin | Published: April 26, 2015 11:55 PM2015-04-26T23:55:17+5:302015-04-26T23:55:17+5:30
नेपाळ व भारतात विनाशी भूकंपाने हैदोस घातला असताना, गुगल व फेसबुक यासारख्या आधुनिक वेबवाहिन्यांनी भूकंपात सापडलेल्या लोकांना
नवी दिल्ली : नेपाळ व भारतात विनाशी भूकंपाने हैदोस घातला असताना, गुगल व फेसबुक यासारख्या आधुनिक वेबवाहिन्यांनी भूकंपात सापडलेल्या लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तींना शोधण्यास मदत केली आहे.
सोशल वेबसाईट गुगल व फेसबुकच्या पर्सन फाइंडर तंत्राने भूकंपग्रस्त लोकांना हरवलेल्या प्रिय व्यक्त ींचा शोध घेण्यास मदत केली.
नेपाळमधील बीरगंज भागात राहणाऱ्या हिमत्रमका कुटुंबाने आपण सुरक्षित आहोत हे भारतातील नातेवाईकांना कळविण्यासाठी फेसबुकचा आधार घेतला. आम्ही सुखरूप आहोत हे आम्ही फेसबुकच्या माध्यमातून कळविले असे नितेश हिमत्रमका यांनी सांगितले. प. बंगाल व उत्तर प्रदेशातील अनेक लोकांनी फेसबुकच्या सेफ्टी अॅपचा वापर करून नातेवाईकांना आपली खुशाली कळवली. फेसबुकने हे सेफ्टी अॅप गेल्या आॅक्टोबरमध्ये वापरात आणले.