तिस्ता यांनी देणग्यांचा चैनीसाठी केला अपहार
By admin | Published: July 22, 2015 11:51 PM2015-07-22T23:51:27+5:302015-07-22T23:51:27+5:30
माजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या पतीने लोककल्याणासाठी मिळालेला पैसा महागडी दारू, ब्लॅकबेरी मोबाईल फोनसारख्या वस्तू
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या पतीने लोककल्याणासाठी मिळालेला पैसा महागडी दारू, ब्लॅकबेरी मोबाईल फोनसारख्या वस्तू आणि ऐषोरामावर उधळला. पुरावे नष्ट करण्यातही त्यांचा सहभाग होता, असा दावा गुजरातच्या पोलिसांनी अटकपूर्व जामिनाला विरोध करताना सर्वोच्च न्यायालयात सादर प्रतिज्ञापत्रात केला आहे.
तिस्ता आणि त्यांचे पती जावेद आनंद हे सबरंग ट्रस्ट आणि सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस (सीजेपी) या दोन ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या दाम्पत्याने गुजरात दंगलीतील पीडितांसाठी मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. दंगलीत जळालेल्या गुलबर्ग सोसायटीत संग्रहालय उभारण्यासाठी त्यांनी निधी गोळा केला होता. त्याचा वापर त्यांनी चैनीसाठी केला. शिक्षण, कायदेशीर लढ्याच्या नावाखाली त्यांनी हा पैसा वापरला, असेही पोलिसांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)