तिस्ता सेटलवाड यांच्या एनजीओची मान्यता रद्द

By admin | Published: June 16, 2016 08:26 PM2016-06-16T20:26:54+5:302016-06-16T20:26:54+5:30

सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची एनजीओ 'सबरंग ट्रस्ट'ची मान्यता रद्द करण्यात आली

Teesta Setalvad's NGO approval canceled | तिस्ता सेटलवाड यांच्या एनजीओची मान्यता रद्द

तिस्ता सेटलवाड यांच्या एनजीओची मान्यता रद्द

Next

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची एनजीओ 'सबरंग ट्रस्ट'ची मान्यता रद्द करण्यात आली आहे. या ट्रस्टचं लायसन्स रद्द केल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं आहे.
एफसीआरएचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिस्ता सेटलवाड यांच्या एनजीओवर कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबर 2015मध्ये सबरंग ट्रस्टला एफसीआरएचा परवाना रद्द करण्यात आला होता. एनजीओला 108 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्यासही सांगितलं होतं. तिस्ता आणि त्याचे पती जावेद यांच्या विरोधात परदेशी पैसाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा गुजरात पोलीस आणि सीबीआय तपास करत आहेत.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सीबीआयनं या दोघांविरोधात एफआयआर दाखल केलं होतं. अमेरिकास्थित फोर्ड फाऊंडेशनकडून तिस्ता सेटलवाड एनजीओसाठी पैसा गोळा करत होती. मात्र पैशाचा दुरुपयोग केल्याचं चौकशीअंती समोर आलं आहे. 

Web Title: Teesta Setalvad's NGO approval canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.