IITच्या विद्यार्थ्यांची कमाल, ड्रोननं फक्त 18 मिनिटांत 32 किमी दूरवर पोहोचवले Blood Sample

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 04:23 PM2019-06-08T16:23:22+5:302019-06-08T16:38:39+5:30

एका ड्रोनची किंमत जवळपास 10 ते 12 लाख रुपये आहे.

Tehri Drone Transports Blood Sample From Remote Area | IITच्या विद्यार्थ्यांची कमाल, ड्रोननं फक्त 18 मिनिटांत 32 किमी दूरवर पोहोचवले Blood Sample

IITच्या विद्यार्थ्यांची कमाल, ड्रोननं फक्त 18 मिनिटांत 32 किमी दूरवर पोहोचवले Blood Sample

Next
ठळक मुद्देसीडी स्पेस कंपनीच्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत ड्रोनने रक्ताचे नमुने पाठवण्याची चाचणी केली.एका ड्रोनची किंमत जवळपास 10 ते 12 लाख रुपये आहे.ड्रोनची हवाई रेंज 50 किमी आहे.

नवी दिल्लीः आरोग्य केंद्रातून रुग्णांच्या रक्ताचे नमुने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यासाठी ड्रोन सेवेच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी ड्रोनने रक्ताचे नमुने पाठवण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. सीडी स्पेस कंपनीच्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत ड्रोनने रक्ताचे नमुने पाठवण्याची चाचणी केली. ज्यात 32 किमी दूरवरच्या पीएचसी नंदप्रयागवरून रक्ताचा नमुना घेऊन हा ड्रोन फक्त 18 मिनिटांत जिल्हा रुग्णालयात पोहोचला आहे.

रुग्णालयांपर्यंत जाता येत नाही, अशा लांब पल्याच्या रुग्णांना 555 टेली मेडिसिन सेवा ही मोलाची ठरत आहे. अशाच पद्धतीने रुग्णांना मदत करण्यासाठी सीडी स्पेस रोबोटिक्स कंपनीने पीएचसी-सीएचसीमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी ड्रोनमार्फंत पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्यामध्ये लांब पल्ल्याचा किंवा डोंगराळ भागात राहणाऱ्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात येण्याचा त्रास वाचेल.  

आयआयटी कानपूरमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी याचा डेमो सुद्धा दाखवला आहे. रक्ताचे नमुने पाठवण्यासाठी घेतलेल्या चाचणीनुसार 32 किमी दूरवरच्या पीएचसी नंदगाववरून फक्त 18 मिनिटांत हा ड्रोन जिल्हा रुग्णालयात पोहोचला. यावेळी डॉ. सुशील, एसटीएस सुरेंद्र थलवाल आणि मुकेश इत्यादी उपस्थित होते. तर, डीएम सोनिका यांनी सांगितले की, कंपनीने स्वत: ड्रोनचे डेमो दाखविले आहेत. त्यांनी याला टेली मेडिसिन सेवेला जोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, याची सर्वतोपरी चौकशी केल्यानंतरच निर्णय घेऊ शकतो. 

ड्रोन टीम लीडर निखिल उपाध्याय यांनी सांगितले की, हा ड्रोन भारतात तयार करण्यात आला आहे. देशात पहिल्यांदा याची चाचणी बौराडी येथील जिल्हा रुग्णालयात घेण्यात आली होती. एका ड्रोनची किंमत जवळपास 10 ते 12 लाख रुपये आहे. तसेच, ड्रोनची हवाई रेंज 50 किमी आहे. इलेक्ट्रिक पॉवरवर आधारित हा ड्रोन 400 ग्रॅमपर्यंत वजन नेऊ शकतो. या ड्रोनला चालवण्यासाठी दोन व्यक्तींची गरज भासते, असेही निखिल उपाध्याय यांनी यावेळी सांगितले.  



 

Web Title: Tehri Drone Transports Blood Sample From Remote Area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.