Tejashwi Yadav Engagement, Marriage: सहा वर्षांची मैत्री, लालूपूत्र तेजस्वी यादवांनी घेतले एअरहोस्टेससोबत सात फेरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 17:43 IST2021-12-09T17:42:34+5:302021-12-09T17:43:44+5:30
Tejashwi Yadav wedding today: झट मंगनी पट शादी! लालू प्रसाद यादव तेजस्वीच्या एलेक्सिसशी लग्न करण्याचा निर्णयावर खूश नव्हते. ती ख्रिश्चन असल्याने लालू यांना हे नाते पसंत नव्हते.

Tejashwi Yadav Engagement, Marriage: सहा वर्षांची मैत्री, लालूपूत्र तेजस्वी यादवांनी घेतले एअरहोस्टेससोबत सात फेरे
बिहारच्या निवडणुकीत गेल्या वर्षी मोठे यश मिळविल्याने लालू यादवांचा पूत्र तेजस्वी यादव यांना विवाहासाठी तरुणींकडून मागणी घातली जात होती. या तरुणींचा आज मोहभंग झाला आहे. कारण तेजस्वी यादवांनी 'झट मंगनी पट शादी' करत सर्वांना धक्का दिला आहे. एअरहॉस्टेस राहिलेल्या मैत्रिणीसोबत त्यांनी लग्न केले आहे. (Tejaswi Yadav Marriage)
राजदचे बिहारमधील विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काल, बुधवारी गुपचूप साखरपूडा उरकून घेतला होता. त्यांनी त्यांची मैत्रिण एलेक्सिस सोबत दुसऱ्या दिवशी दिल्लीत लग्न देखील केले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. एलेक्सिस उर्फ राशेल गोडिन्हो आता यापुढे राजेश्वरी यादव या नावाने ओळखली जाणार आहे.
साखरपुड्यानंतर तेजस्वी यादव यांना लग्नासाठी दोन महिन्यांचा वेळ हवा होता. मात्र, काही कारणास्तव त्यांना बुधवारी साखरपुड्यानंतर गुरुवारी लगेचच लग्न देखील करावे लागले आहे. तेजस्वी यांचे लग्न दिल्लीच्या सैनिक फार्मवर झाले आहे. हा फार्म त्यांची बहीण मीसा भारती यांचा आहे. लग्नामुळे सैनिक फार्मवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. प्रत्येक गाडी तपासली जात आहे. याचसोबत अनेक बाऊन्सर्स तैनात करण्यात आले आहेत. आतमध्ये प्रवेशासाठी त्रिस्तरीय सुरक्षा तपासणीतून जावे लागत आहे. पत्रकारांना आजुबाजुलाही फिरकू दिले जात नाहीय.
लालूंना होती नापसंत....
तेजस्वी यादवांची पत्नी आधी एअरहॉस्टेस होती. दिल्लीच्या वसंत विहारमध्ये ती राहते, चंदीगढच्या एका शाळेत तिचे वडील मुख्याध्यापक होते. सहा वर्षांपूर्वी या दोघांची भेट झाली होती, यानंतर दोघेही एकमेकांना भेटत होते. सूत्रांनुसार लालू प्रसाद यादव तेजस्वीच्या एलेक्सिसशी लग्न करण्याचा निर्णयावर खूश नव्हते. ती ख्रिश्चन असल्याने लालू यांना हे नाते पसंत नव्हते. याबाबत कुटुंबातील अन्य सदस्यांना समजल्यावर त्यांनीही अंतर ठेवले होते. परंतू अखेर तेजस्वी यादव यांनी लालू यांना मनविले.