Tejashwi Yadav : "नरेंद्र मोदी यावेळी सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील"; तेजस्वी यादव यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 10:59 AM2024-06-11T10:59:35+5:302024-06-11T11:05:45+5:30

Tejashwi Yadav And Narendra Modi : तेजस्वी यादव यांनी पाटण्याला पोहोचताच मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Tejashwi Yadav targets pm Narendra Modi after he became prime minister in third term modi cabinet portfolio | Tejashwi Yadav : "नरेंद्र मोदी यावेळी सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील"; तेजस्वी यादव यांचा घणाघात

Tejashwi Yadav : "नरेंद्र मोदी यावेळी सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील"; तेजस्वी यादव यांचा घणाघात

विरोधी पक्षनेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पाटण्याला पोहोचताच मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाटणा विमानतळावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना तेजस्वी यादव म्हणाले की, "कोणाला कोणतं खातं द्यायचं हे ठरवण्याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे."

"पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे, मात्र यावेळी विरोधी पक्ष खूप मजबूत आहेत. बिहारला विशेष दर्जा देऊ असं पंतप्रधान मोदींनी निवडणुकीत वारंवार सांगितलं, पण यावेळी निवडणुकीत ते बोलले नाही. यावेळी बिहार निर्णायक भूमिकेत आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी नितीश कुमार आणि सर्वांनीच केली पाहिजे."

"नरेंद्र मोदी सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील"

"बिहारमध्ये आरक्षण ७५ टक्के केलं आहे. त्याचाही नवव्या यादीत समावेश व्हायला हवा. तसेच देशभरात जातीवर आधारित जनगणना झाली पाहिजे. आता पंतप्रधान मोदी इकडच तिकडच बोलून सुटू शकत नाहीत. विरोधी पक्ष खूप मजबूत आहे. जागांमध्ये फारसा फरक नाही. यावेळी भाजपालाच बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असले तरी यावेळी ते सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील."

तेजस्वी यादव यांनी असंही सांगितलं की "२०२९ (लोकसभा निवडणुकीत) आम्हाला किती जागा मिळाल्या? शून्य. २०२० मध्ये (विधानसभा निवडणुकीत) सर्वात मोठा पक्ष (RJD) म्हणून आलो. यावेळी (लोकसभा निवडणुकीत २०२४) चार जागा मिळाल्या, त्यामुळे पुढच्या वेळी ते चार पटीने वाढेल."

Web Title: Tejashwi Yadav targets pm Narendra Modi after he became prime minister in third term modi cabinet portfolio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.