Video: मोठी दुर्घटना होता होता राहिली; 30 शाळकरी मुलांना घेऊन बस पाण्यात बुडाली, सर्व वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 04:21 PM2022-07-08T16:21:28+5:302022-07-08T16:21:48+5:30
शुक्रवारी सकाळची ही घटना आहे. तेलांगानामध्ये पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.
एक महिना उशिरा आलेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. यातच आज एक मोठी दुर्घटना होता होता राहिली आहे. तेलंगानाच्या मेहबूबनगरमध्ये आज ३० शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस अचानक पुराच्या पाण्यात बुडाली. स्थानिकांनी धाव घेतली म्हणून मोठी दुर्घटना टळली. सर्व मुलांना बाहेर काढण्यात आले.
स्कूल बस नेहमीप्रमाणे रत्यावरून जात होती. अंडरब्रिज होता. चालकाने पाहिले तर तेवढे पाणी नव्हते. म्हणून तो पुढे जाऊ लागला. एवढ्यात अचानक पाण्याचा लोंढा आला आणि निम्म्याहून अधिक बस पाण्यात बुडाली. स्थानिकांनी आरडाओरडा ऐकला आणि तात्काळ बसकडे धाव घेतली. सर्व शाळकरी मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, असे स्थानिकांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळची ही घटना आहे. तेलांगानामध्ये पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. तेलंगाना टुडेनुसार अंडरब्रिज पार करताना स्कूल बसला अचानक पाण्याने वेढले. बसमध्ये अडकलेली ३० मुले आश्चर्यकारकरित्या वाचली आहेत. बस पाण्यात बुडाल्याचे पाहून स्थानिकांनी धाव घेतली आणि एकेक मुलाला खांद्या, कंबरेबर घेऊन गळ्यापर्यंतच्या पाण्यातून चालत बाहेर काढले. ही बस नंतर पाण्यातून बाहेर काढण्यात आली.
पहा थरारक व्हिडीओ...
#WATCH | Telangana: A school bus, carrying 30 students, was partially submerged in a flooded street in Mahbubnagar today. The students were rescued by the locals. The bus was later brought out of the spot. pic.twitter.com/7OOUm8as0v
— ANI (@ANI) July 8, 2022