Telangana & Rajasthan Assembly Elections : तेलंगणा, राजस्थानमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 07:34 AM2018-12-07T07:34:31+5:302018-12-07T18:56:26+5:30

जयपूर/ हैदराबाद -  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकी च्या मतदानाला सुरुवात झाली आहे. कडेकोट बंदोबस्तात ...

Telangana & Rajasthan Assembly Elections : तेलंगणा, राजस्थानमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान | Telangana & Rajasthan Assembly Elections : तेलंगणा, राजस्थानमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान

Telangana & Rajasthan Assembly Elections : तेलंगणा, राजस्थानमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान

जयपूर/ हैदराबाद -  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये 199 जागांसाठी 2274 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पण मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनीही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे अंदाज आहेत. मात्र, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी विशेष रणनीती आखून प्रचारात घेतलेली आघाडी सर्वेक्षणांचे आकडे व सत्ताबदलाची परंपरा मोडीत काढते का? याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, तेलंगणामध्ये 119 जागांसाठी मतदान होत आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर काँग्रेसचे आव्हान आहे. येथे 32 हजार 715 केंद्रांवर मतदान होत आहे. अंदाजे तीन कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील.

मतदारराजानं कोणाला आपला कौल दिला आहे, याचा निकाल 11 डिसेंबरला लागणार आहे. 

LIVE

Get Latest Updates

05:23 PM

संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राजस्थानमध्ये 72.7 टक्के मतदान



 

03:56 PM

दुपारी तीन वाजेपर्यंत राजस्थानमध्ये 59.43 टक्के मतदान



 

03:55 PM

दुपारी तीन वाजेपर्यंत तेलंगणामध्ये 56.17 टक्के मतदान



 

02:46 PM

हैदराबाद : सानिया मिर्झानं बजावला मतदानाचा हक्क



 

02:45 PM



 

02:45 PM



 

02:44 PM



 

02:44 PM

राजस्थान विधानसभा निवडणूक : दुपारी 1 वाजेपर्यंत 41.53टक्के मतदान



 

02:44 PM

तेलंगणा विधानसभा निवडणूक : दुपारी 1 वाजेपर्यंत 49.15 % मतदान



 

02:43 PM



 

02:43 PM

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

02:42 PM

तेलंगणा : काँग्रेसच्या उमेदवारावर हल्ला



 

02:40 PM



 

12:02 PM

राजस्थान : जालोर येथे ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांनी घातला गोंधळ



 

12:01 PM

राजस्थान विधानसभा निवडणूक : सकाळी 11 वाजेपर्यंत 21.89 टक्के मतदान



 

12:00 PM

राजस्थान : केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी केले मतदान



 

11:59 AM

राजस्थान : 105 वर्षीय महिलेनं केले मतदान, केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध नाही

 


10:31 AM

राजस्थान :  बिकानेर येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड


 

 

10:30 AM

राजस्थान : काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांनी जोधपूर येथे केले मतदान  


 

10:03 AM

तेलंगणा विधानसभा निवडणूक : सकाळी 9.30 वाजेपर्यंत 10.15% मतदान



 

10:02 AM



 



 

10:00 AM

तेलंगणा विधानसभा निवडणूक : सकाळी 9 वाजेपर्यंत 6.11 टक्के मतदान



 

09:59 AM



 

09:59 AM

हैदराबाद : अभिनेता चिरंजीवीनं रांगेत उभे राहून केले मतदान



 

09:57 AM

AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले मतदान



 

09:54 AM

ज्वाला गुट्टाचं मतदान यादीतून नाव गायब



 

09:36 AM

जालोर (राजस्थान): ईव्हीएममध्ये बिघाड, अद्याप मतदानास सुरुवात नाही

 


09:28 AM

ईव्हीएममध्ये बिघाड,मतदान उशिरानं सुरू 

राजस्थानच्या चित्तोडगड, बेंगू, सवाई मधोपूरमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मतदान प्रक्रिया उशिरानं सुरू झाल्यानं. मतदारांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले. 

09:21 AM

तेलंगणा विधानसभा निवडणूक : सकाळी 9 वाजेपर्यंत 8.97% मतदान



 

09:20 AM

राजस्थान : गृहमंत्री गुलाब चंद कटारिया यांनी केले मतदान



 

09:14 AM



 

09:14 AM

शरद यादव यांच्या वादग्रस्त विधानावर वसुंधरा राजेंची प्रतिक्रिया :'मला हे खरोखर अपमानास्पद वाटत आहे, हा महिलांचा अपमान आहे. निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी'



 

09:01 AM

राजस्थान : केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी जयपूरमध्ये वैशाली नगर येथे केले मतदान

 


08:52 AM

राजस्थान : 80 वर्षांच्या महिलेनं बजावला मतदानाचा हक्क



 

08:51 AM

तेलंगणा : उप-मुख्यमंत्र्यांनी वारंगल येथे केले मतदान



 

08:50 AM

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी बजावला मतदानाचा हक्क

 


08:36 AM

तेलंगणा : भाजपाच्या जी. किसन रेड्डी यांनी केले मतदान

 


 

08:31 AM

तेलंगणा : प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आणि अक्कीनेरी नागार्जुन यांनी रांगेत उभे राहून मतदान केले, हैदराबाद येथील ज्युबली हिल्स मतदान केंद्रात मतदान सुरू



08:11 AM

राजस्थान : गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी मतदानापूर्वी शिव मंदिरात केली प्रार्थना



 

08:09 AM

तेलंगणा : जलसिंचन मंत्री टी हरिश राव यांनी केले मतदान



 

08:09 AM



 



 

(तेलंगणात १२0 कोटी जप्त; मतदारांना वाटण्यासाठी आला होता बेहिशेबी पैसा?)



 


 


 



 


 


Web Title: Telangana & Rajasthan Assembly Elections : तेलंगणा, राजस्थानमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.