तेलंगणात मतदान सुरू होते, आंध्र प्रदेश पोलीस अचानक राज्यात घुसले, धरणाचे दरवाजे उघडले; पाण्यासाठी पुन्हा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 11:16 AM2023-12-01T11:16:31+5:302023-12-01T11:21:14+5:30
तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील पाण्याचा वाद आता पुन्हा एकदा चिघळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. यातच आता दुसरीकडे तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील पाण्याचा वाद आता पुन्हा एकदा चिघळणार आहे. आंध्रप्रदेश पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसासह नागार्जुनसागर धरण परिसरात घुसले आणि त्यांनी धरणाचे दरवाजे उघडले. यामुळे आता दोन्ही राज्यातील तणान वाढण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याचे संकट सुरू आहे.
Telangana Election 2023 : तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळणार? आमदारांना बंगळुरूला पाठवण्याची तयारी
दरम्यान, आंध्र प्रदेशातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी ४०० हून अधिक पोलीस कर्मचारी धरण परिसरात गेले आणि नागार्जुनसागर धरणाचे दरवाजे उघडले. याआधी या पोलिसांनी धरणाच्या ३६ पैकी निम्मे दरवाजे ताब्यात घेतल्याने निवडणुकीमध्ये व्यस्त असलेले तेलंगणा पोलिसही हैराण झाले होते.
अभियंता-इन-चीफ सी. नारायण रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशकडे ३,००० क्युसेक पाणी सोडण्यासाठी गेट उघडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. राज्यात पिण्याच्या पाण्याचे संकट शिगेला पोहोचले आहे.
"तणाव टाळण्यासाठी खबरदारी घ्या"
अधिकारी नारायण रेड्डी म्हणाले की, दोन राज्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी आम्ही स्वतःला सावरत होतो पण धोका शिगेला पोहोचला आहे. आमच्या पिण्याच्या गरजेसाठी ते आम्हाला वेळेवर पाणी सोडू देत नव्हते. अडचण अशी आहे की त्यांनी नागार्जुनसागर धरण आपल्या ताब्यात असल्याचे गृहीत धरले आहे. त्यांनी आमच्या भागात अतिक्रमण केले आहे.
पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, कृष्णा नदीच्या डाव्या बाजूचे कार्यक्षेत्र तेलंगणात येते आणि उजव्या बाजूचे क्षेत्र आंध्र प्रदेशात येते. या महत्त्वाच्या धरणाला २६ दरवाजे आहेत. यातील १३ दरवाजे तेलंगणाच्या अखत्यारीत येतात आणि उर्वरित १३ दरवाजे आंध्र प्रदेशच्या अखत्यारीत येतात. गुरुवारी आंध्र प्रदेश पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रकल्पाचा अर्धा भाग ताब्यात घेतला. तेलंगणानेही अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
आता निवडणुका संपल्यानंतर दोन्ही राज्यांमधील संघर्ष वाढू शकतो. मात्र, आंध्रप्रदेश पोलिसांनी उघडलेल्या गेटवर आंध्र प्रदेश पोलिसांचा अधिक बंदोबस्त आहे, त्यामुळे या वेळी तो बंद करण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष वाढू शकतो.
#Nalgonda
— Akalankam Seshu (@ienalgonda) November 30, 2023
Tension prevailed at Nagarjunasagar dam. Andhra Pradesh Police entered into Telangana limits and damaged CC cameras.@XpressHyderabad@NewIndianXpress@Kalyan_TNIE@balaexpressTNIEpic.twitter.com/WLONQl7XiY