Telangana: भाजपच्या मुस्लिम नेत्याने मशिदीला दान केले कुलर, मुस्लिमांनी सर्व कुलर बाहेर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 04:51 PM2022-04-10T16:51:45+5:302022-04-10T16:52:00+5:30

Telangana: भाजप आपल्या मुस्लिम नेत्यांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या प्रयत्नात भाजप नेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Telangana: BJP Muslim leader donates cooler to mosque, Muslims throw out all coolers | Telangana: भाजपच्या मुस्लिम नेत्याने मशिदीला दान केले कुलर, मुस्लिमांनी सर्व कुलर बाहेर फेकले

Telangana: भाजपच्या मुस्लिम नेत्याने मशिदीला दान केले कुलर, मुस्लिमांनी सर्व कुलर बाहेर फेकले

googlenewsNext

तेलंगणा: भाजप आपल्या मुस्लिम नेत्यांच्या माध्यमातून तेलंगणातील अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या प्रयत्नात भाजप नेत्यांना अनेक अडचणी येत आहेत. अशाच एका प्रकरणात भाजपच्या एका मुस्लिम नेत्याला त्यांच्याच समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागले. भाजप नेत्याने मशिदीसाठी कुलर दान केले, मात्र नमाजासाठी आलेल्या मुस्लिम लोकांनी हे कुलर उचलून मशिदीबाहेर फेकले.

सविस्तर माहिती अशी की, तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील भाजप नेते मोहम्मद अन्वर यांनी मशिदीत नमाज अदा करताना उष्णतेपासून आराम मिळावा, यासाठी मशिदीला अनेक कुलर दान केले. यावेळी त्यांनी मशिदीत उपस्थित लोकांसमोर भाजपचे कौतुक केले. ते म्हणाले, 'भाजपने मुस्लिमांसाठी खूप काही केले आहे. भाजपचे मुस्लिमांवर खूप प्रेम आहे, खरे तर काँग्रेसनेच मुस्लिमांना भाजपपासून दूर ठेवले. भाजपने तिहेरी तलाक विधेयक आणून मुस्लिम महिलांसाठी मोठे काम केले आहे. मुस्लिम खूप खूश आहेत, काँग्रेसने मुस्लिमांसाठी काही केले नाही, फक्त त्यांचा वापर केला आहे.' 

कुलर भाजप नेत्याच्या घरासमोर टाकले
भाजप नेते मोहम्मद अन्वर यांच्या वतीने मशिदीला कुलर दान केल्यानंतर विकाराबादच्या मुस्लिम जनतेने त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. मोहम्मद अन्वर यांनी मशिदीला दिलेले कुलर मुस्लिम जनतेने उचलले आणि अन्वर यांच्या घराबाहेर आणून टाकले. ही घटना विकाराबाद जिल्ह्यातील बवंतराम मंडळातील तोरुमामिडी भागातील आहे.
 

Web Title: Telangana: BJP Muslim leader donates cooler to mosque, Muslims throw out all coolers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.