Video: आमदाराने टोल कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली, व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 03:48 PM2023-01-04T15:48:33+5:302023-01-04T15:50:23+5:30

आमदार महाशय टोल कर्मचाऱ्यास मारहाण करताना दिसून येत आहेत. 

Telangana BRS MLA beat toll employee, video went viral on social media | Video: आमदाराने टोल कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली, व्हिडिओ झाला व्हायरल

Video: आमदाराने टोल कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली, व्हिडिओ झाला व्हायरल

googlenewsNext

तेलंगणाच्या मंडामारी टोल प्लाझावर भारत राष्ट्रीय समिती म्हणजे बीआरएसच्या आमदाराने एका टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दुर्गम चिन्नैय्याने असं या आमदाराचं नाव असून त्यांनी टोल कर्मचाऱ्यासोबत मारहाण केल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज असलेल्या या व्हिडिओत आमदार महाशय टोल कर्मचाऱ्यास मारहाण करताना दिसून येत आहेत. 

मंडामारी सर्कलच्या पोलिसांनी सांगितले की, बीआरएसचे आमदार दुर्गम चिन्नैय्याने मंडामारीच्या टोल प्लाझावर एका कर्मचाऱ्यासमवेत मारहाण केली. याबाबत अद्याप पोलीस स्टेशनला कुठलीही तक्रार नाही. मात्र, याप्रकरणाचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, टोल कर्मचाऱ्याने गाडी अडवल्यामुळे आमदाराला राग आला, त्यातूनच ही मारहाण करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

Web Title: Telangana BRS MLA beat toll employee, video went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.