BJP विरोधात आणखी एक पक्ष मैदानात! चंद्रशेखर राव मिशन २०२४ च्या तयारीला, राष्ट्रीय पक्षाची करणार घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 11:09 AM2022-10-04T11:09:03+5:302022-10-04T11:10:10+5:30
२०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षीय नेत्यांनी सुरू केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही आता तयारी सुरू केली आहे.
हैदराबाद : २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षीय नेत्यांनी सुरू केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही आता तयारी सुरू केली आहे. टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव ५ ऑक्टोबर दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
५ ऑक्टोबर रोजी तेलंगणा भवनमध्ये पक्षाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ऑफीसमधून या संदर्भात निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षांनी सुरू केली आहे. भाजपसह काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेचा मोठा खुलासा! PFI च्या संपर्कात होते ISISचे २२ दहशतवादी
या बैठकीनंतर केसीआर आपल्या आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. टीआरएस नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार आहे,पक्षाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर केसीआर ९ ऑक्टोबरला दिल्लीत जाहीर सभा घेणार असल्याचे बोलल जात आहे.
"एनडीए सरकार चालवण्यात अपयशी ठरले आहे. देशातील जनतेला मजबूत सरकार हवे आहे. गुजरात मॉडेल फसले आहे, अशी प्रतिक्रिया टीआरएस नेते श्रीधर रेड्डी यांनी दिली.
‘धनुष्यबाण’ कोणालाही नाही? ठाकरे गटाला अन्य चिन्हाचा पर्याय
राष्ट्रीय पक्षाच्या घोषणेवरुन काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली आहे.तेलंगणा काँग्रेस अभियान समितीचे अध्यक्ष मधु गौर म्हणाले,'केसीआर यांचा राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय मूर्खपणाचा आहे. त्यांनी तेलंगणातील जनतेला मूर्ख बनवले आणि आता देशातील जनतेला बनवायचे आहे. आपले अपयश लपवण्यासाठी आणि दिल्लीतील दारू घोटाळ्यापासून कुटुंबीयांना वाचवण्याचा हा डाव आहे.
भाजपला फायदा व्हावा म्हणून केसीआर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपमुक्त देशासाठी काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे. केसीआर यांनाही तेच हवे असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, असंही मधु गौर म्हणाले.