तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचं तिरुपती मंदिरात 5 कोटी सोन्याचं दान
By admin | Published: February 22, 2017 12:45 PM2017-02-22T12:45:18+5:302017-02-22T14:23:42+5:30
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिरुपती मंदिरात पाच कोटी सोन्याचे दागिने दान केले आहेत
Next
ऑनलाइन लोकमत
विजयवाडा, दि. 22 - तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिरुपती मंदिरात पाच कोटी सोन्याचे दागिने दान केले आहेत. स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्याच्या आनंदात चंद्रशेखर राव यांनी हे दान केलं आहे. बुधवारी सकाळी मंदिरात विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी चंद्रशेखर राव यांनी हे सर्व दागिने भगवान वेंकटेश्वरच्या चरणी अर्पण केले. याव्यतिरिक्त चंद्रशेखर राव यांनी इतर देवी देवतांसाठी 59 लाखांचं दान केलं.
चंद्रशेखर राव यांनी हे दान केल्याने टीकेचे धनी झाले आहेत. राव यांनी सरकारी पैशांची नासाडी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आपले वैयक्तिक नवस पुर्ण करण्यालाठी सार्वजनिक निधीमधील पैसा वापरला जात असल्याचं विरोधक बोलत आहेत. याअगोदरही ऑक्टोबर 2016 मध्ये चंद्रशेखर राव यांनी वारंगल येथील भद्रकाली मंदिरात 11.2 किलो सोन्याचा मुकूट भेट दिला होता. ज्याची किंमत 3.5 कोटी रुपये होती.
Telangana CM KCR offered gold ornaments at Tirumala Temple,says he prayed for good position in country for ppl of both states (AP&Telangana) pic.twitter.com/9O3oI6p7MX
— ANI (@ANI_news) February 22, 2017
येणा-या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री राव पुन्हा एकदा भद्रकाली मंदिरात जाणार असल्याची माहिती आहे. यावेळी ते सोन्याच्या मिशा भेट देणार आहेत. विरोधक पुन्हा एकदा याचा विरोध करत आहेत. राव याआधीदेखील अशाप्रकारच्या वादात अडकले होते जेव्हा त्यांनी नऊ एकर जमिनीवर 50 कोटी किंमतीत आलिशान बंगला बांधला होता.