तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भद्रकाली देवीसाठी बनवला 3.6 कोटींचा मुकूट

By admin | Published: October 8, 2016 12:43 PM2016-10-08T12:43:53+5:302016-10-08T14:57:08+5:30

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वारंगलमधील देवी भद्रकालीसाठी 3.6 कोटींचा सोन्याचा मुकूट बनवून घेतला आहे.

Telangana Chief Minister created Bhadrakali Devi for Rs 3.6 crores | तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भद्रकाली देवीसाठी बनवला 3.6 कोटींचा मुकूट

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भद्रकाली देवीसाठी बनवला 3.6 कोटींचा मुकूट

Next
लोकमत ऑनलाइन 
हैदराबाद, दि.8 - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वारंगलमधील देवी भद्रकालीसाठी 3.6 कोटींचा सोन्याचा मुकूट बनवून घेतला आहे. 9 ऑक्टोबरला हा मुकूट देवीला चढवण्यात येणार आहे. स्वतंत्र तेलंगणा राज्य अस्तित्वात आल्यास, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील देवी-देवतांना सोन्याचे दागिने अर्पण करेन, असा नवस के.चंद्रशेखर राव यांनी केला होता. स्वतंत्र तेलंगणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान त्यांना हा नवस केल्याचे बोलले जात आहे.
 
स्वतंत्र तेलंगणाचे मुख्यमंत्री झाल्यानंतर, पूर्ण झालेला नवस फेडण्याचाच एक भाग म्हणून चंद्रशेखर राव यांनी भद्रकाली देवीसाठी हा कोट्यवधींचा मुकूट बनवला आहे. भद्रकाली देवीसाठी बनवण्यात आलेल्या मुकूटाचे  वजन 11 किलो आणि 700 ग्रॅम इतके आहे. 9 ऑक्टोबर रोजी के. चंद्रशेखर राव सपत्नीक भद्रकाली मंदिराला भेट देऊन हा मुकूट देवीच्या चरणी अर्पण करणार आहेत.
 

Web Title: Telangana Chief Minister created Bhadrakali Devi for Rs 3.6 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.