तेलंगणाचे मुख्यमंत्री जाहीर सभेत भडकले, 'कुत्र्यां'शी केली आंदोलकांची तुलना, मग...
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 11, 2021 04:36 PM2021-02-11T16:36:27+5:302021-02-11T16:48:21+5:30
आपल्या मूर्खपणामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा यायला नको. येथून चालते व्हा, अन्यथा आपल्याला मार खावा लागेल, असे राव यांनी म्हटले होते...
हैदराबाद - तेलंगाणाचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी एका जाहीर सभेद वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. बुधवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव भडकले आणि त्यांनी आंदोलन करणाऱ्यांची तुलना 'कुत्र्यां'सोबत केली. (Telangana cm compares protestors with dogs in a rally)
मुख्यमंत्री या निदर्शकांना संबोधून म्हणाले, शांततेत रहायचे असेल तर रहा अन्यथा चालते व्हा. आपल्या मूर्खपणामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा यायला नको. येथून चालते व्हा, अन्यथा आपल्याला मार खावा लागेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नालगोंडा जिल्ह्यात नागार्जुन सागर भागात एका सरकारी योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर जाहीर सभेला संबोधित करत होते. याचवेळी काही लोकांनी निदर्शन केले. तेव्हा राव यांनी त्यांना उद्देशून अपशब्द वापरले.
राव लोकांना संबोधित करत असतानाच महिलांसह काही लोकांनी त्यांच्या विरोधात निदर्शन करायला सुरुवात केली. यामुळे वैतागलेले मुख्यमंत्री म्हणाले, 'आता आपण मेमो दिला आहे, येथून जा. जर येथे राहण्याची तुमची इच्छा असेल, तर शांततेत रहा अन्यथा आपल्याला मार खावा लागेल. आम्ही अनेकांना पाहिले आहे, आपल्या सारखे किती ही कुत्रे येथे आहेत.'' यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
विरोधकांनी केली माफीची मागणी -
तेलंगाना काँग्रेस समितीचे प्रभावारी मणीकम टॅगोर यांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी,असे म्हटले आहे. टॅगोर म्हणाले, तेलंगानाचे मुख्यमंत्री एक जाहीर सभेत महिलांना 'कुत्रा' म्हणून संबोधतात. ही लोकशाही आहे, हे राव यांनी लक्षात ठेवावे. आपण यांच्यामुळेच मुख्यमंत्री पदावर आहात. ते आपले बॉस आहेत. चंद्रशेखर माफी मागा.