KCR Vs BJP: केसीआर यांचा भाजपवर गंभीर आरोप; घोडेबाजार केल्याचा व्हिडिओ जारी, पाहा 10 मोठे अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 08:42 AM2022-11-05T08:42:10+5:302022-11-05T08:43:10+5:30

भाजपने आतापर्यंत 8 सरकारे पाडली आहेत आणि इतर 4 सरकार पाडण्याची त्यांची योजना आहे, असे केसीआर यांनी म्हटले आहे.

telangana cm kcr released video of mla horse trading against bjp | KCR Vs BJP: केसीआर यांचा भाजपवर गंभीर आरोप; घोडेबाजार केल्याचा व्हिडिओ जारी, पाहा 10 मोठे अपडेट्स

KCR Vs BJP: केसीआर यांचा भाजपवर गंभीर आरोप; घोडेबाजार केल्याचा व्हिडिओ जारी, पाहा 10 मोठे अपडेट्स

googlenewsNext

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी पुन्हा एकदा भाजपवर मोठा आरोप केला आहे. केसीआर यांनी एक व्हिडिओ जारी करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना भाजपने लाच दिल्याचा आरोप केला आहे. तसेच, भाजपने आतापर्यंत 8 सरकारे पाडली आहेत आणि इतर 4 सरकार पाडण्याची त्यांची योजना आहे, असे केसीआर यांनी म्हटले आहे.

भाजपच्या 24 लोकांची टीम वेगवेगळ्या राज्यांमध्ये आमदारांना आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचे आणि निवडून आलेल्या सरकारांवर बुलडोझर चालवण्याचे काम करत आहे, असे केसीआर म्हणाले. तसेच, त्यांनी न्यायव्यवस्थेला आवाहन केले आहे की, तेलंगणाच्या आमदारांना बेकायदेशीरपणे आपल्या पक्षात सामील करून घेण्याचे प्रकरण केवळ या राज्यापुरते मर्यादित नाही, तर इतर राज्यांमध्येही असे घडण्याची शक्यता आहे, असे केसीआर यांनी म्हटले आहे.

केसीआर vs भाजप - 10 मोठे अपडेट्स

1) तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) पक्षाचे चार आमदारांना समोर करत केसीआर यांनी भाजपवर त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच, यासंबंधी आपल्याकडे एक तासापेक्षा जास्त कॅमेरा फुटेज आहे, असा दावा केसीआर यांनी दावा केला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पाच मिनिटांचा व्हिडिओही प्ले केला.

2) हा व्हिडीओ गेल्या आठवड्यातील आहे. तेलंगणातील एका फार्महाऊसमधून हा व्हिडिओ समोर आला आहे. राज्यातील पोटनिवडणुकीपूर्वी या व्हिडिओने राजकीय वादळ निर्माण केले होते. आता या प्रकरणाने जोर पकडला असून राज्यातून हा राष्ट्रीय मुद्दा बनत असल्याचे दिसून येत आहे.

3) केसीआर म्हणाले की, हा व्हिडिओ पुरावा आहे की फार्महाऊसवर आमदारांना बेकायदेशीरपणे खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात होता. व्हिडीओमध्ये अमित शहा यांचा 20 वेळा तर पंतप्रधान मोदींचा तीनदा उल्लेख करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

4) याप्रकरणी मुख्यमंत्री केसीआर यांनी आरोप करूनही भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही. 

5) न्यायव्यवस्थेला देश वाचवण्याचे आवाहन करत केसीआर म्हणाले की, विरोधी नेत्यांचे व्हिडिओ सर्वोच्च न्यायालयात पाठवणार आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमधील सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

6) भाजपने केसीआर यांनी केलेले आरोप नाकारले असून ते भाड्याने घेतलेल्या कलाकारांसोबत व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहेत, असे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी केसीआर यांच्यावर टीका करताना म्हटले की, फार्म हाऊस कुटुंबातील दहशतीची पातळी प्रतिबिंबित करते.

7)  केसीआर यांनी दोन दिवसांपूर्वी एका सभेत म्हणाले होते की, "दिल्लीतील काही दलाल तेलंगणाच्या स्वाभिमानाला आव्हान देण्यासाठी आले होते...ऑपरेशन लोटस."

8) या प्रकरणी एका व्यावसायिकासह तिघांना अटक करण्यात आली होती. रामचंद्र भारती उर्फ ​​सतीश शर्मा, नंदा कुमार आणि सिंह्याजी स्वामी यांना 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

9) 2 नोव्हेंबर रोजी तेलंगणा राष्ट्र समितीचे आमदार पायलट रोहित रेड्डी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये आरोप केला होता की, रामचंद्र भारती आणि नंद कुमार हे दोघेही भाजपचे आहेत. त्यांनी पायलट रोहित रेड्डी यांची भेट घेतली आणि भाजपमध्ये येण्यासाठी त्यांना 100 कोटी रुपयांची ऑफर दिली होती.

10) याचबरोबर, पायलट रोहित रेड्डी यांना अशी धमकीही दिली की, जर ते ऑफर स्वीकारण्यास अयशस्वी ठरले तर त्यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण ब्युरो सारख्या केंद्रीय एजन्सीमार्फत फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: telangana cm kcr released video of mla horse trading against bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.