मानलं! जिल्हाधिकाऱ्यानं पत्नीच्या प्रसूतीसाठी निवडलं सरकारी रुग्णालय, घालून दिला आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 08:29 PM2021-11-11T20:29:37+5:302021-11-11T20:30:23+5:30
Inspirational Story : आयएएस अधिकारी आपल्या पत्नीला कोणत्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जाऊ शकत होते, परंतु त्यांनी सरकारी रुग्णालय कोणत्या कॉर्पोरेट रुग्णालयापेक्षा कमी नाही हे त्यांना सिद्ध करायचं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं.
तेलंगणमधील जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीला ग्रामीण भागातील एका सरकारी रुग्णालयात पत्नीला प्रसूतीसाठी दाखल करून एक आदर्श घालून दिला आहे. बुधवारी त्यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. अनेकदा मध्यमवर्गीय लोकंही सरकारी रुग्णालयात जाण्यासाठी दहा वेळा विचार करतात अशा परिस्थितीत भद्राद्री-कोठागुजेम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनुदीप दुरीशेट्टी यांनी आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी आंध्र, छत्तीसगढ सीमेवरील एका सरकारी रुग्णालयात दाखल केलं.
बुधवारी सकाळी त्यांची पत्नी माधवी यांचं सी-सेक्शन ऑपरेशन झालं आणि त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. ज्येष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ सुरपनेनी श्रीकांती आणि भार्गवी यांनी त्यांची सर्जरी केली. त्यांच्या या निर्णयानंतर रुग्णालयातील एका डॉक्टरने आपली प्रतिक्रियाही दिली. "आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. नियोनेटोलॉजिस्ट डॉ. व्हाय एस राजशेखर रेड्डी यांनी बाळाची तपासणी करून आवश्यकती औषधं दिली," अशी माहिती त्यांनी दिली.
आयएएस अधिकारी आपल्या पत्नीला हैदराबाद येथील कोणत्याही मोठ्या रुग्णालयात आपल्या पत्नीला घेऊन जाऊ शकत होते. वास्तविक पाहता रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्या वेळोवेळी तपासणीसाठी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी रुग्णालयात येत होत्या, असंही डॉक्टरांनी सांगितलं. तेलंगणचे अर्थमंत्री ज्यांच्याकडे मंगळवारी आरोग्य मंत्रालयाची धुरा सोपवण्याती आली होती, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीच्या प्रसूती सरकारी रुग्णालयात केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
Warmest Congratulations to @Collector_BDD & his wife. I hope both the mother & the child are doing well. It gives us immense pride to see how under the able leadership of CM KCR Garu, state medical infrastructure has proven to be the first choice of people. https://t.co/H7jN2ldMZi
— Harish Rao Thanneeru (@trsharish) November 10, 2021
"@Collector_BDD आणि त्यांच्या पत्नीचं हार्दिक अभिनंदन, आई बाळ दोघंही ठीक आहेत अशी आशा करतो. मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आरोग्य विभाग लोकांची पहिली पसंती ठरली आहे," असं टी हरीश राव म्हणाले.